Home /News /mumbai /

लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय? मुंबई-पुण्यात काय होणार?

लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय? मुंबई-पुण्यात काय होणार?

कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते.

    मुंबई, 17 मार्च : कोरोनाव्हायरस झपाट्याने जगभरात पसरत आहे. चीनच्या वुहानपासून या विषाणूची सुरुवात झाली खरी मात्र आता या विषाणूने साऱ्या जगात दहशत पसरवली आहे. भारतातही या विषाणूचा शिरकाव होत आहे. दरम्यान चीनमधून हातपाय पसरवायला सुरुवात केलेल्या विषाणूचा चीनवर आता कमी परिणाम जाणवत आहे. त्याचे कारण आहे लॉक डाऊन. चीनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सरकारने संपूर्ण देश बंद केला. आता भारतातही अशा परिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही. देशात कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे भारतात मृतांची संख्याही तीन झाली आहे. आज मुंबईतही कोरोनाने पहिला बळी घेतला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते. वाचा-'कोरोना'वर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही व्हायरस, आणखी काही डॉक्टरांचा जीव धोक्यात लॉक डाऊन केल्या काय होणार? सध्या सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ आपत्तीजनक परिस्थिती असल्याशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते. वाचा-मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह मुंबई-पुण्यावर होणार गंभीर परिणाम कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी भारताकडे सध्या 30 दिवसांचा कालावधी आहे. भारतात सध्या कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुंबईसह पुण्यातील सर्व शाळा आणि विद्यापीठांसह रेस्टॉरंट्स, बार आणि इतर अनावश्यक किरकोळ दुकानं बंद करण्यात आली आहेत.गर्दी कमी व्हावी यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. घरातून कार्यालयीन काम करणे शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याची सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. ममात्र लॉक डाऊन झाल्यास मुंबई, पुण्यातील सर्व कामे ठप्प होतील. याचा सगळ्यात जास्त फटका व्यवसायिकांना बसेल. कारण अनिश्चित काळासाठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. मात्र कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लॉक डाऊन सारखे गंभीर उपाय भारताला करावे लागतील. दरम्यान अद्याप याबाबत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही. वाचा-#BREAKING कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या