भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीचे काय झाले? नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीचे काय झाले? नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार

'ऑनलाईन मेगाभरती कोण चालवत होतं, याची माहिती समोर आली पाहिजे. व्यापमपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे'

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहण्यास मिळाला. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीचा तपास सत्तांतर झाल्यानंतर एनआयएकडे का सोपवला असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थिती केला.

राज्यातील गुन्हेगारी प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणानंतर नाना पटोले यांनी जशास तसे  उत्तर फडणवीस यांना दिले.

'गेल्या सरकारमध्ये कामगार कल्याणचे अध्यक्ष मुन्ना यादव अनेक गुन्हे झाले आहे. महिलांना धमकावणे या प्रकरणात गुन्हेही दाखल झाले. पण या यादववर गेल्या काळात गुन्हे दाखल होऊ नये, याकरता कोणाचा दबाव आहे हे गृहमंत्र्यांनी शोधून काढलं पाहिजे.  धनंयज मुंडे यांनी गेल्या वेळी माजी मुख्यमंत्र्यांचा फोन तपासल्यास सगळी माहिती कळेल असं म्हटलं होतं, याबद्दल मग चौकशी केली पाहिजे, असा सणसणीत टोला नाना पटोले यांनी फडणवीस यांना लगावला.

'मागच्या सरकारमध्ये मोठी घटना घडली होती, भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्राला कलंक लागला होता. या प्रकरणाची जगभरात चर्चा झाली.  जातीय तणाव निर्माण राज्यात निर्माण झाला. त्याच काय झालं.  शरद पवार यांनी SIT मागितली होती.  पण सत्ता परिवर्तन झाल्यावर केंद्राने  केंद्रीय तपास विभागाकडे याचा तपास गेला, यामध्ये काय गडबडी होती,  कोण दोषी होतं. याची माहिती अद्याप कळू शकली नाही, अशा लोकांना सुरक्षा देणं हे राज्याला न शोभणारं आहे', असं म्हणत फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख न करत भाजपवर निशाणा साधला.

'३३ कोटी वृक्षांच्या चौकशीची मागणी झाली आणि मग मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली', असा टोलाही पटोले यांनी लगावला.

'मध्यप्रदेशमध्ये व्यापम घोटाळा झाला. या घोटाळ्यात अनेक जणांनी आत्महत्या केली. याबद्दल काय तपास झालो, कुणाचा हात होता. याची माहिती काही कळू शकली नाही, असाच घोटाळा मेगाभरतीमध्ये झाला, महाऑनलाईन कुणाची होती, जे मेरिट होते, त्यांचे अधिकार डावलण्यात आले, ऑनलाईन मेगाभरती कोण चालवत होतं, याची माहिती समोर आली पाहिजे. व्यापमपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे', असा आरोपही पटोले यांनी केला.

' मुंबईत सापडलेलं जिलेटिन नागपूरमधून आली होती आणि पुलवामाची स्फोटकं नागपुरमधून आली होती. हे नागपूर कनेक्शन काय याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

'खासदार मोहन डेलकर यांनी माझ्या त्रासाला महाराष्ट्रात न्याय मिळेल म्हणून मी इथे आत्महत्या करतो असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. यावर सरकारने गुन्हे दाखल का केले नाहीत? यातील नाव समोर आली पाहिजे', अशी मागणीही पटोले यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: March 5, 2021, 4:47 PM IST

ताज्या बातम्या