Home /News /mumbai /

दिवसाच्या उजेडात अन् रात्रीच्या अंधारातही बैठका सुरूच; गेल्या 72 तासात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं?

दिवसाच्या उजेडात अन् रात्रीच्या अंधारातही बैठका सुरूच; गेल्या 72 तासात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं?

शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर बसले असताना बंडखोर नेत्यांवर पुढील व्यूहरचना आखली जात होती. त्यादरम्यान बंडखोर नेते (Rebel MLA) आणि त्यांच्या 'सुपर पॉवर पार्टी'मध्ये संभाषणही झालं.

    मुंबई 26 जून : शनिवारचा दिवस सरत असताना महाराष्ट्रात शुक्रवारी रात्री झालेल्या राजकीय बैठकांच्या बातम्यांनी दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे (Maharashtra Political Crisis). रात्रीची शांतता असली तरी कोणतीही मोठी राजकीय घटना कोणत्याही क्षणी घडू शकते, असं आता स्पष्ट दिसतं. शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर बसले असताना बंडखोर नेत्यांवर पुढील व्यूहरचना आखली जात होती. त्यादरम्यान बंडखोर नेते (Rebel MLA) आणि त्यांच्या 'सुपर पॉवर पार्टी'मध्ये संभाषणही झालं. ही गुप्त बैठक वडोदरा येथे झाली. या बैठकीला शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या गुप्तचर बैठकीची माहिती कुणालाही कळू नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आलं होतं. नियोजन एवढ्या पातळीवर होतं की, शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीची माहिती शनिवारी सायंकाळी समोर आली. एकनाथ शिंदे गुवाहाटी येथील रॅडिसन हॉटेलमधून काळ्या काचा असलेल्या कारमध्ये गुपचूप निघून गेले आणि त्याची कोणाला कल्पनाही आली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का झाले नाहीत? भाजपनेच त्यांचा घात केल्याचा शिवसेनेचा आरोप एक खाजगी जेट (ज्याला सेसना प्रायव्हेट जेट म्हणतात) एका विशिष्ट ठिकाणी एकनाथ शिंदेची वाट पाहत होतं. या विमानाने सकाळी 10.30 वाजता गुवाहाटीहून दिल्लीला उड्डाण केलं. पण दिल्ली हे एकनाथ शिंदे यांचं गंतव्यस्थान नव्हतं. त्यांना दिल्लीऐवजी वडोदरा येथे जावं लागलं. 12:45 ला दिल्लीला पोहोचलेले एकनाथ शिंदे यांचं पुढचं विमान 15 मिनिटांनी होतं. इथे दुसरं खाजगी जेट (डसॉल्ट फाल्कन 2000) एकनाथ शिंदे यांची वाट पाहत होतं. या जेटने त्यांनी वडोदरा येथे उड्डाण केलं. रात्री अडीचच्या सुमारास एकनाथ शिंदे उशिराने वडोदरा येथे पोहोचले. इकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेही साडेदहाच्या सुमारास मुंबईहून इंदूरला रवाना झाले. प्रायव्हेट जेटने उड्डाण केलेल्या फडणवीसांचे डेस्टिनेशनसुद्धा इंदूर नव्हते, तर त्यांना वडोदरा येथेच जायचं होतं, मात्र या गुप्तचर बैठकीची कोणालाच कल्पना नव्हती. यामुळे ते आधी इंदूरला गेले आणि नंतर तेथून वडोदरा गाठलं . शिवसेनेला मोठा झटका, नरेश म्हस्केंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा रात्री अडीचच्या सुमारास दोन्ही नेते वडोदरात होते. दोघांची खास भेट झाली. या संवादादरम्यान काय झालं, हे कळू शकलेलं नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शाह हेही वडोदरा येथील सर्किट हाऊसमध्ये उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अमित शाह यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, भाजप आता महाराष्ट्राच्या राजकीय लढाईत उतरलं आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना उपसभापतींनी नोटीस बजावली आहे. सर्व बंडखोर आमदारांना 27 जून, सायंकाळी 5:30 पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. जारी केलेल्या नोटीसनुसार, बंडखोर आमदारांनी प्रतिसाद न दिल्यास त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही, असं मानलं जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल. बंडखोर आमदार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्याची नोटीसही शिवसेनेने बजावली आहे. त्यांना लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कायम राहील, असे चार ठरावांमध्ये सांगण्यात आले. बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच बाळासाहेबांच्या नावाचा गैरवापर होऊ नये, यासाठी शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचेही ठरले. त्याचवेळी सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे आधी नाथ होते, आता दास झाले आहेत. शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वडिलांच्या नावाने मते मागून दाखवावी.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या