सुशांत प्रकरणात नेमके काय चुकले? संजय राऊतांनी पोलीस तपासावर ठेवले बोट!

सुशांत प्रकरणात नेमके काय चुकले? संजय राऊतांनी पोलीस तपासावर ठेवले बोट!

'मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा'

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच 'नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली' असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन भाजप, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न उपस्थितीत केले आहे.

संजय राऊत म्हणता की...

- या प्रकरणात पोलिसांनी यासंदर्भात झीरो एफआयआर दाखल करून तपास सुरू ठेवायला हवा होता, (पण सुशांतच्या नातेवाईकांना तेव्हा कुणाविरुद्धही एफआयआर नोंदवायचा नव्हता व ते कुटुंब सुशांतच्या आत्महत्येनंतर सरळ पाटण्यात पोहोचले.)

आदित्य ठाकरेंचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र, पण सुशांत प्रकरणात...;राऊतांचे थेट सवाल

- भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याचे ठरवले व मंत्रिमंडळातील तरुण मंत्र्यांचे नाव या प्रकरणाशी जोडून सनसनाटी निर्माण केली. दुसऱया बाजूला दोन इंग्रजी वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्याप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांना सुशांतप्रकरणी आव्हान देत राहिल्या. त्यामुळे पोलीस गोंधळले.

- हे प्रकरण ‘हाय प्रोफाईल’ होत आहे असे दिसून येताच मुंबई पोलिसांतर्फे एक दिवसाआड तपासाबाबत माहिती पत्रकारांसाठी जाहीर करायला हरकत नव्हती. यात कुणी मंत्री किंवा राजकीय व्यक्ती असेल तर पोलीस त्याचेही स्टेटमेंट घेतील, असे सुरुवातीलाच सांगायला हरकत नव्हती.

- मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे.

संजूबाबाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, स्वॅब रिपोर्टही आला निगेटिव्ह!

-  सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला. दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? हा पहिला प्रश्न. स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत खुलासा केला. तरीही शंका असतील तर त्यासाठी काही वृत्तवाहिन्यांना हाताशी पकडून बदनामी मोहीम राबवणे हा मार्ग आहे काय? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

'या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत व इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे' असा थेट आरोपही राऊत यांनी केला.

Published by: sachin Salve
First published: August 9, 2020, 10:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading