S M L

कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी काय केलं ? -हायकोर्ट

निव्वळ गोमांस आहे या संशयावरून अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत असं पठाण यांनी कोर्टाला सांगितलं.

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2017 04:32 PM IST

कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी काय केलं ? -हायकोर्ट

विवेक कुलकर्णी, मुंबई

21 आॅगस्ट : कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्या असा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.

याचिकाकर्ते शादाब पटेल यांनी हायकोर्टाने गौरक्षकांसंदर्भात मार्गदर्शक तत्वं तयार करण्यात यावीत अशी कोर्टाकडे केली होती त्यावर कोर्टाने नियम तयार करणं विधिमंडळाचं काम असून ते त्यांनीच करावं असं म्हटलंय. परवा म्हणजे २३ आॅगस्टला राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं असा आदेश कोर्टाने दिला आहे.एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून आज कोर्टात युक्तीवाद केला. २ सप्टेंबरला बकरी ईद असून त्यावेळेसच गणेशोत्सव असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्याकरता कोर्टाने मार्गदर्शक तत्वं जारी करावीत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

निव्वळ गोमांस आहे या संशयावरून अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत असं पठाण यांनी कोर्टाला सांगितलं.

दरम्यान, कोर्टात झालेल्या एका नाट्यमय घडामोडीत याचिकाकर्ते शादाब पटेल यांचे वडील शब्बीर पटेल यांनी ही याचिका फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं कोर्टात म्हणून याचिकेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावर याचिकाकर्त्यांनी कौटुंबिक भांडणे काढून याचिकेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 04:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close