मुंबई, 1 जुलै : शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांची आज तब्बल 10 तास ईडीच्या (Sanjay Raut to Appear Before ED) कार्यालयात चौकशी सुरू होती. शेवटी तब्बल 10 तास चौकशी झाल्यानंतर ते काही वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.
10 तासांच्या चौकशीनंतर काय म्हणाले संजय राऊत?
10 तास चौकशी झाली. मी स्वतः खासदार आहे आणि मी चौकशीला सहकार्य केले असून पुढे जर बोलावले तर पुन्हा चौकशीसाठी येणार असल्याचे राऊत यांनी चौकशीनंतर सांगितले. या चौकशीमध्ये गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणातील मनी लॉंन्ड्री प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी झाली.
या चौकशीत प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत? जो व्यवहार दोघात झाला आहे त्याचे डिटेल्स ईडीने तपासले. त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागवण्यात आला. ईडीने आणखी एका केसच्या संदर्भात संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहेत. यात एक डी एफ एल घोटाळ्यात देखील संजय राऊत यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. तर पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत अजूनही ईडीच्या अटकेत आहे. संजय राऊत यांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.