Elec-widget

एकनाथ खडसेंविरोधात काय कारवाई केली ?, हायकोर्टाचा सरकारला सवाल

एकनाथ खडसेंविरोधात काय कारवाई केली ?, हायकोर्टाचा सरकारला सवाल

तीन आठवड्यात राज्य सरकारला यांबद्दल उत्तर देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

  • Share this:

14 जुलै : माजी महसुल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दिलेल्या आदेशावर काय कारवाई केली असा सवाल मुंबई हायकोर्टाने सरकारला विचारलाय.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात याचिका कोर्टात दाखल केलीये. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिलेत.  तीन आठवड्यात राज्य सरकारला यांबद्दल उत्तर देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

आपल्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेली बेहिशेबी संपत्तीबद्दलची याचिका रद्द करा, अशी विनंती खडसे यांची मुंबई हायकोर्टाकडे केलीय. दमानिया यांची याचिका राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा त्यांचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...