Home /News /mumbai /

Shivsena Political Crises: बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत काय कारवाई होऊ शकते?

Shivsena Political Crises: बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत काय कारवाई होऊ शकते?

सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 34 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती.

    मुंबई, 24 जून : शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाला शिवसेना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे गटाचे 34 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 34 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. विधानमंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर काय कारवाई होऊ शकतो यावर एक नजर टाकूया. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत नेमकी काय कारवाई होऊ शकते? >> शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधानसभा उपध्याध्यक्षाकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या आमदारांना नोटीस जारी करू शकतात. >> आमदारांना नोटीस जारी केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष आमदारांच काय म्हणणं हे जाणून घेतील. >> कोरोनानंतर आमदार ऑनलाईन सुनावणीसाठी उपस्थित राहू शकतात किंवा त्यांना स्वतः याठिकाणी येऊन सुनावणीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. >> जर ते ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थीती या बँडविडथची उपलब्धता पाहता दिवसाला केवळ 2 किंवा 4 आमदारांची सुनावणी पार पडू शकते. >> ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही मात्र विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न होणारं आहेत. अपात्रतेच्या कारवाईबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले? आमच्याकडे 40 शिवसेना आमदार आणि 12 अपक्ष आमदार आहेत. अशात अल्पमतात असताना गटनेता बदलता येत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आमदारांना अपत्रा ठरवण्याबाबतच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की बैठकीला हजर नाही म्हणून एखाद्याला अपात्र ठरवणं हे हस्यास्पद आणि बेकायदेशीर आहे. याचा कोणताही परिणाम आमदारांवर होणार नाही. शिंदे म्हणाले की त्यांनी आमच्या दोन महिला आमदारांनाही नोटीस बजावली. मात्र आमच्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही कितीही नोटीस बजावल्या तरी आमच्यावर परिणाम होणार नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. सध्या आकड्याला खूप महत्त्व आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला हा अधिकार आहे. कायदेशीर लागणारं संख्याबळ आमच्याकडे आहे, त्यापेक्षाही जास्त संख्याबळ आमच्याकडे आहे, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shiv sena

    पुढील बातम्या