ATKT असलेल्या विद्यार्थ्यांचं काय? भाजप आमदार राज्यपालांच्या भेटीला

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांचं काय? भाजप आमदार राज्यपालांच्या भेटीला

शासनाने पदवी अंतिम वर्षांची परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेतला का? असा सवाल शेलारांनी केला.

  • Share this:

मुंबई, 02 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता राज्य सरकारने सरासरी गुण देऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहे. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागणार का? असा सवाल करत आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहून आमदार  आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

शासनाने पदवी अंतिम वर्षांची परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा तीन महिन्यानंतर त्यांची परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेतला का? राज्यातील सर्व विद्यापीठ मिळून ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात ATKT असल्याने त्यांना नापास करणार का? असे प्रश्न शेलार यांनी उपस्थितीत केले.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा, उद्धव ठाकरेंना विचारला थेट सवाल

तसंच पूर्वी एका विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका असलेला खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला "जळीत बीए" असे बिरुदावली लागली. तशी दुर्दैवाने बिरुदावली आता "कोरोना ग्रॅज्युएट" म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे, असा सवाल आशिष शेलार यांनी  उपस्थिती केला.

पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती करण्यासाठी आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

First published: June 2, 2020, 4:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या