पश्चिम रेल्वे पुन्हा कोलमडली, अंधेरी- चर्चगेट स्लो ट्रॅकवरच्या गाड्या रद्द

कालप्रमाणेच आजचा दिवसही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 4 वरुन सुटणाऱ्या धीम्या गतीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या

Madhura Nerurkar | Updated On: Jul 4, 2018 10:40 AM IST

पश्चिम रेल्वे पुन्हा कोलमडली, अंधेरी- चर्चगेट स्लो ट्रॅकवरच्या गाड्या रद्द

मुंबई, 04 जुलै: मंगळवारी सकाळी 7.30 च्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल १२ तासांनंतर अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली. काल रात्री ८ वाजताच्या सुमारास जलद मार्गावरून ही लोकल चर्चगेटच्या दिशेने निघाली होती. आता सर्व काही सुरळीत सुरू होईल असे वाटत असतानाच आज पुन्हा अंधेरीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या सर्व स्लो- लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: 47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन!

हा निर्णयही ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळेत घेतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कालप्रमाणेच आजचा दिवसही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 4 वरुन सुटणाऱ्या धीम्या गतीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे ट्रॅक दुरूस्तीचं काम असल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सकाळपासून चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटं उशीरानं धावत आहेत. तर विरारहून चर्चगटकडे जाणाऱ्या गाड्या अर्धा तास उशीरानं धावत आहेत. जलद पट्ट्याच्या गाड्यांमध्ये कोणताही खंड नसला तरी त्याही गाड्या उशीराने धावत आहेत.

हेही वाचा: पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

सकाळी 7.30 वाजता मुंबईत सकाळपासूनच एकीकडे संततधार सुरू होती. तर दुसरीकडे कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची लगबग...त्याचवेळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवरच कोसळला...ओव्हरहेड वायर तुटली...आणि पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली.

सकाळी 10.00 वाजता एनडीआरएफ टीम दाखल ट्रॅकवरचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू झालं. पण कोलमडलेली रेल्वे अख्खा दिवस सावरलीच नाही. दुपारी 2.30वाजेच्या सुमारास हार्बरची लाईनवरची पहिली लोकल सुटली. अखेर बारा तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर आली.

हेही वाचा: भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close