रुळाला तडा गेल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक लोकल रद्द

रुळाला तडा गेल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक लोकल रद्द

वांद्रे स्थानकात अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी: ऐन गर्दीच्या वेळी चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. धीम्या मार्गावर माटुंगा आणि माहीम दरम्यान रुळाला तडा गेल्यामुळे प्लॅटफॉर्म क्र 2 वरून चर्चगेट च्या दिशेने कोणतीही पुढची सूचना मिळेपर्यंत धावणार नाही असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चार स्थानकांमध्ये लोकल सध्या थांबत नसल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे.

धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. माटुंगा, प्रभादेवी, लोअर परेल, महालक्षी स्थानकांवर लोकलचा थांबा काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. तर वांद्रे स्थानकात अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण रुळाला तडे गेल्यानं अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दादर प्लॅटफॉर्म 1 ला तुफान गर्दी असलेली दिसत आहे.

बातमी अपडेट होत आहे...

First published: January 18, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या