पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक अर्धा तास उशिरानं धावत आहेत.ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत. काल रात्री पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते जोगेश्वरीच्या दरम्यान ब्लॉक होता. या मार्गावर दुरूस्तीची कामं सुरू होती

  • Share this:

21 डिसेंबर:  आज सकाळपासूनच   पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत  झाली आहे. सध्या  या रेल्वेची वाहतूक  अर्धा उशिराने चालत असून याचा प्रवाशांना त्रास होतो आह

चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक अर्धा तास  उशिरानं धावत आहेत.ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत. काल रात्री पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते जोगेश्वरीच्या दरम्यान ब्लॉक होता. या मार्गावर दुरूस्तीची कामं सुरू  होती.  यामुळे वाहतूक मंदावली होती. याचाच परिणाम आता पश्चिम रेल्वेच्याआज सकाळच्या वाहतूकीवर झाला आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकांची गैरसोय होते  आहे.

मुंबईतील रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी मध्य रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे याच महिन्यात विस्कळीत झाली होती. तसंच काही दिवसांपूर्वी रूळ तुटले म्हणून हार्बर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यामुळए आता प्रवाशांची गैरसोय होते आहे. लवकरच मुंबईत एसी लोकल सुरू होणार आहे.  या सगळ्यात लोकलचा विस्कळीतपणा कधी कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 08:57 AM IST

ताज्या बातम्या