मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भले शाब्बास, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थोपाटली शिवसैनिकांची पाठ!

भले शाब्बास, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थोपाटली शिवसैनिकांची पाठ!

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 24 ऑगस्ट : सत्तेत आल्यानंतर शिवसेनेनं (shivsena) शहाणपण दाखवत मवाळ भूमिका घेतली होती. पण, आज शिवसैनिकांचा आक्रमक बाणा आज पाहण्यास मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत शिवसैनिकांनी राज्यभर भाजप कार्यालयावर एकच हल्लाबोल केला. शिवसैनिकांच्या या धाडसाचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी कौतुक करत पाठ थोपडली आहे. नारायण राणे आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाही, पण आज शिवसैनिकांनी आपले नवे रुप दाखवत भाजपला गारद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हात उगारण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपासून ते राज्यभर जोरदार निदर्शनं केली. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर आक्रमकपणे हल्ला केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना स्टाईल आंदोलन करणार्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं. या शहरात कोरोना लस कंपल्सरी! घरं हुडकून दारात येऊन देणार आता Vaccine सकाळपासून सुरू झालेली आंदोलनं अजूनही राज्यात ठिकठिकाणी होत आहे. दुपारी आज नारायण राणे  यांना अखेर अटक झाली आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत फटाके फोडण्यास सुरूवात केली. युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. आज युवासैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून स्तुती केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणखी जल्लोष वाढल्याचं पाहण्यास मिळत आहे. निलेश राणेंची पोलिसांसोबत बाचाबाची अन् जेवणाच्या ताटावरून राणेंना अटक, VIDEO तर, आज सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयांवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबई, ठाण्यात, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गात शिवसैनिकांनी भाजपविरोधात जोरदार राडा घातला. नारायण राणे यांना अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला. मुंबईतील कुलाबा परिसरातील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
First published:

Tags: Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या