मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईकरांसाठी यंदाचा पावसाळा ठरणार अवघड, समुद्रात लाटांची असणार अशी अवस्था

मुंबईकरांसाठी यंदाचा पावसाळा ठरणार अवघड, समुद्रात लाटांची असणार अशी अवस्था

किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा (Alert) दिला जातो. या वर्षी मान्सून (Monsoon) सामान्य असेल, असा अंदाज काही दिवसांपूर्वीच वर्तवण्यात आला आहे.

किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा (Alert) दिला जातो. या वर्षी मान्सून (Monsoon) सामान्य असेल, असा अंदाज काही दिवसांपूर्वीच वर्तवण्यात आला आहे.

किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा (Alert) दिला जातो. या वर्षी मान्सून (Monsoon) सामान्य असेल, असा अंदाज काही दिवसांपूर्वीच वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, 21 एप्रिल: महाराष्ट्राला 700 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा समुद्र किनारा (Seashore) लाभलेला आहे. त्यामुळे पश्चिमेला असणाऱ्या अरबी समुद्रातील (Arabian Sea) घडामोडींचा प्रभाव किनापट्टीवरील गावं आणि शहरांवर दिसून येतो. राजधानीचं शहर असलेली मुंबई (Mumbai) हे किनारपट्टीवर वसलेलं महाराष्ट्रातलं सर्वांत मोठं शहर आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईवर मान्सूनचे चांगले-वाईट परिणाम दिसतात. विशेषत: जेव्हा समुद्र जास्त खवळलेला असतो तेव्हा किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा (Alert) दिला जातो. या वर्षी मान्सून (Monsoon) सामान्य असेल, असा अंदाज काही दिवसांपूर्वीच वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात मुंबईला एकूण 22 दिवस अरबी समुद्राच्या भरतीचा सामना (High-tide) करावा लागेल. यादरम्यान समुद्रात 22 दिवस उंच लाटा निर्माण होतील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं (Disaster Management Department) दिली आहे. मुंबई लाईव्हनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मंगळवारी (19 एप्रिल 2022) सीएसएमटी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान विविध प्रशासकीय संस्था आणि इतर एजन्सींच्या अधिकाऱ्यांना सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुण्यात निवृत्त कर्नलनं पत्नीवर गोळी झाडून स्वतःही उचललं टोकाचं पाऊल या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षानं सादर केलेल्या डेटानुसार, जून व जुलैमध्ये प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाच दिवस भरतीचे असतील. 16 जून आणि 15 जुलै या दोन दिवशी अनुक्रमे दुपारी 1 वाजून 35 मिनिटे आणि 1 वाजून 22 मिनिटांच्या आसपास सर्वांत मोठी भरती (Largest High Tide) येण्याची शक्यता आहे. या भरतीदरम्यान 4.87 मीटर उंचीच्या लाटा (Waves) उसळण्याची शक्यता आहे. सामान्यपणे 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा घातक समजल्या जातात. अशा भरतीमुळे सखल भागात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडून पूर (Flood) येण्याचा धोका असतो. मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात 13 ते 18 जूनदरम्यान भरतीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. या शिवाय, 13 ते 18 जुलै, 11 ते 15 ऑगस्ट आणि 9 ते 13 सप्टेंबर या कालावधीदरम्यानही अरबी समुद्राला मोठी भरती येऊ शकते, असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं आहे. या वर्षी मान्सून सामान्य असून, नेहमीप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नाल्यांमधील गाळ काढण्याची आणि रस्त्यांच्या पॅचिंगची कामं सुरू झाली आहेत. याशिवाय, मुंबईमधील 72 ठिकाणं भूस्खलन-प्रवण क्षेत्र (Landslide-prone Areas) म्हणून मार्क करण्यात आली आहेत. त्यापैकी 45 ठिकाणं ही अतिधोकादायक आहेत. त्यामुळे पालिकेनं त्या ठिकाणच्या रहिवाशांना नोटीस पाठवण्याची योजना आखली आहे. अतिधोकादायक भागांत राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. IPS ची अफलातून शक्कल..! Facebook वर रिक्वेस्ट पाठवून आरोपीला अडकवलं जाळ्यात गेल्यावर्षी मान्सूनदरम्यान एकूण 18 दिवस समुद्राच्या पाण्याची पातळी जास्त होती. मात्र, यावर्षी समुद्र जास्त काळ खवळलेल्या स्थितीमध्ये असू शकतो. त्यामुळे मुंबईला या वर्षी जास्त धोका असेल.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Monsoon, Mumbai, Rain, Weather update

पुढील बातम्या