मुंबईकरांना पुन्हा भरणार हुडहुडी.. हवामान विभागाचे संकेत

मुंबईकरांना पुन्हा भरणार हुडहुडी.. हवामान विभागाचे संकेत

थंडी अचानक गायब झाली असं तुम्हाला वाटू लागलं असेल म्हणून अंथरूण-पांघरूण पुन्हा बॅगमध्ये भरून ठेवायलाही तुम्ही सुरुवात केली असेल पण तसं करू नका.

  • Share this:

मुंबई,20 जानेवारी: गेल्या 15, 16, 17 जानेवारीला मुंबईकरांनी हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवली. याकाळात उत्तरेकडून वाहणार्‍या वार्‍यांमुळे थंडीची लाट संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती. परंतु थंडी गेल्या दोन दिवसांत गायब झाली आहे. तापमानात बऱ्यापैकी वाढ होऊन ते आता तीस-बत्तीस अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे थंडी अचानक गायब झाली असं तुम्हाला वाटू लागलं असेल म्हणून अंथरूण-पांघरूण पुन्हा बॅगमध्ये भरून ठेवायलाही तुम्ही सुरुवात केली असेल पण तसं करू नका. कारण पाहून पणाला आलेली ही थंडी माघारी केली असेल असं वाटत असलं तरी ते पुन्हा तीन दिवस येणारे प्रजासत्ताक दिनापासून 28 तारखेपर्यंत साधारणपणे मुंबईत तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईत 26 27 28 जानेवारीला थंडी परतणार असल्याचे संकेत हवामान खात्याच्या मुंबई शाखेनं दिले आहेत.

या काळात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात मात्र थंडी चांगलीच वाढेल असं सांगण्यात येतंय त्यामुळे हिवाळा अजून संपलेला नाही. मकर संक्रांतीनंतर गारठा कमी होऊ लागतो. हेच आतापर्यंत आपण मानत आलो आहोत. परंतु गेल्या काही वर्षांत ऋतूमध्ये अनेक बदल होत आहेत. गेलेली थंडी वारंवार परतून येते. त्यामुळे 2019 ला तर मुंबईतही थंडी मार्चपर्यंत जाणवत होती. याहीवर्षी थंडी अशी परतून येईल, असे संकेत देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे आता ऋतूमध्ये झालेल्या बदलांची माहिती भारतीय हवामान खातं लवकरच जाहीर करणार आहे.

विशेषतः मान्सूनमध्ये येणारा पाऊस जरा पुढे गेला आहे. पावसाच्या येण्याच्या तारखांमध्ये फार बदल होणार नसला तरीही परत जाण्याच्या तारखांमध्ये मात्र मोठा बदल झाला आहे. हा बदल भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकरी व्यावसायिक सर्वसामान्य यांच्यासाठी ची माहिती हवामान खातं एप्रिलमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. आता साधारणपणे पन्नास वर्षे जुन्या तारखा अजूनही वापरल्या जात आहेत. पण झालेले बदल मात्र आता जाहीर करण्यात येणार आहे. हे बदल फार मोठे नसले तरी महत्त्वाचे आहेत त्यानुसार देशाचा सरकार शेतकरी हे आपल्या पुढल्या काळासाठी नियोजन करीत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2020 08:04 PM IST

ताज्या बातम्या