Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी; पुढील 3 दिवसांत मुंबईत नभ गडगडणार

Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी; पुढील 3 दिवसांत मुंबईत नभ गडगडणार

Weather Update: येत्या काळात हा राज्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर पुढील तीन दिवसांत अवकाळी पाऊस धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल: मागील तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागात राहाणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं आहे. अनेकांच्या द्राक्षांच्या आणि केळीच्या बागासोबतच कांदा पिकाचंही प्रचंड नुकसान झाला आहे. आधीच कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) वैतागलेला शेतकरी वर्ग गारपीटीमुळे हवालदिल झाला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतातील माल बाजापेठांपर्यंत पोहचण्यास अनेक अडचणी येत आहे. दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.

विशेष म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस किंवा गारपीट होतं असली तरी बहुतांशी ठिकाणी तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कमी झालेला कमाल तापमानाचा पारा पुन्हा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. येत्या काळात हा तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर पुढील तीन दिवसांत अवकाळी पाऊस धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

मागील तीन दिवसांपासून बिहार ते दक्षिण तमिळनाडू, झारखंड, ओडिशा, विदर्भ, तेलंगणा आणि रायलसीमा दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्याचरोबर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेनं वाहत आहे. एकंदरित महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यातील हवामान बदलामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

हे वाचा- महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील नागरिकांना मोफत लस मिळणार

त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मुंबई, ठाण्यासोबत उत्तर कोकणातील काही भागात वादळी वारा आणि विजेच्या गडगडासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या सोबतच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं सावट कायम आहे.

Published by: News18 Desk
First published: April 28, 2021, 3:43 PM IST

ताज्या बातम्या