मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Update: आजही मुंबईत पावसाचं धूमशान; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट

Weather Update: आजही मुंबईत पावसाचं धूमशान; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट

Weather Update in Maharashtra: मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईला पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी रात्री देखील मुंबईत अनेक ठिकाणी पावसानं धुव्वाधार हजेरी लावली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 जुलै: मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईला पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी रात्री देखील मुंबईत अनेक ठिकाणी पावसानं धुव्वाधार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्यानं व्यापले आहे. तसेच चेंबूर आणि विक्रोळी याठिकाणी पडझडीच्या गंभीर घटनाही समोर आल्या आहेत. आज मुंबईसह (Mumbai) कोकणातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आजही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy to very Heavy Rain) शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.

पुढील काही तासांत मुंबईसह पालघर, ठाणे, पुणे सातारा आणि कोल्हापूर परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 50 ते 60 किमी प्रती तास इतक्या वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीला काल रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे ठाण्यात बऱ्याच ठिकाणचे रस्ते तुडुंब भरुन वाहत होते. आजही ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा-मुंबईत पावसाचा 'हाय अलर्ट', मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला दिले हे आदेश

मुंबईत सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत 200 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा वसई-विरार शहराला बसला आहे. यामुळे मुंबईसह उपनगरातील परिसरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. अशा अनपेक्षितरित्या घडणाऱ्या दुर्घटना डोळ्यासमोर ठेवून प्रशासनानं सावधगिरी बाळगावी आणि समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले आहेत.

हेही वाचा-Weather Forecast: बळीराजाच्या संकटात वाढ; मराठवाड्यात वाढतोय ढगफुटीचा धोका

येत्या 24 ते 36 तासांत कोकणात अतिवृष्टी

राज्यात मान्सूनची वापसी झाल्यापासून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टीवरील परिसरात तर गेल्या आठवड्यापासून संततधार सुरू आहे. आजही कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांला भारतीय हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील 24 ते 36 तासांत कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai rain, Weather forecast