मुंबई : कुठे पाऊस तर कुठे ऊन तर कुठे वाढणारी उष्णता असं विचित्र वातावरण सध्या राज्यात आहे. त्यामुळे वातावरण बिघडलं आहे अनेक ठिकाणी रोगराई पसरली आहे. तर पिक भुईसपाट झाली आहेत शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार 13 मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD GFS मॉडेल व extended range अंदाज या भागांत आणि पूर्व किनार्यावर गडगडाटीसह पावसाची शक्यता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे कोकण किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये उष्णता खूप जास्त वाढत आहे.
IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार 13 मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता. IMD GFS मॉडेल व extended range अंदाज या भागांत व पूर्व किनार्यावर गडगडाटीसह पावसाची शक्यता. Pl watch for IMD Updates pic.twitter.com/7FD9hts67a
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 11, 2023
नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १५ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्याने हरभरा, गहु, इत्यादी पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Rain fall, Weather, Weather Forecast