Home /News /mumbai /

Weather Update: मुंबईत पावासाचं होणार कमबॅक; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update: मुंबईत पावासाचं होणार कमबॅक; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Weather In Mumbai: मुंबईत मान्सूनचं (Monsoon in mumbai) आगमन झाल्यापासून मुंबईकरांना पावसानं झोडपून काढलं आहे. पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे. यानंतर पुन्हा मुंबईत पावसाचं कमबॅक (rain in mumbai) होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जून: मुंबईत मान्सूनचं (Monsoon in mumbai) आगमन झाल्यापासून मुंबईकरांना पावसानं झोडपून काढलं आहे. पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत पावसाचं कमबॅक (rain in mumbai) होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिवसभर मुंबईत  हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उद्या आणि परवा म्हणजेच 17 आणि 18 जून रोजी मुंबईच्या बहुतांशी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या सायन भागात आज सकाळी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्याचबरोबर हिंदमाता चौकातील रस्तेही तुडुंब वाहत होते. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना अनेक अडचणी आल्या. मुंबईत पुढील आणखी तीन जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईत पाऊस कमबॅक करण्याची शक्यता आहे. काल मंगळवारी मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडला आहे. या बरोबरच, त्याचबरोबर काल मुंबईत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच जोर धरला होता. वेदरमनच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईत हवामानाच्या अनपेक्षित हालचाली नोंदल्या जात आहेत. त्याचबरोबर पुढील तीन तासांत मुंबई आणि ठाण्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हे ही वाचा- Monsoon Update: उत्तरेकडे मान्सूनची वेगात वाटचाल; कोकणात पावसाचा इशारा, मुंबईत कशी असेल स्थिती? भारतीय हवामान खात्याचे वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं की, कुलाबा, सीएसएमटी, वरळी आणि मुंबईच्या लगतच्या किनारी भागात 2 ते 3 तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळीही नवी मुंबई आणि ठाण्यात हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Weather forecast

    पुढील बातम्या