मुंबई, 25 जून: मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनचा (Monsoon in maharashtra) लपंडाव सुरू झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याला पूर्णपणे झोडपून काढल्यानंतर मान्सूननं राज्यात विश्रांती घेतली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि काही प्रमाणात सांगली, कोल्हापूर हे पाच जिल्हे याला अपवाद ठरली आहेत. सध्या देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला असल्यानं राज्यात हे हवामानाचे परिणाम दिसत आहेत.
पुढील आणखी आठ दिवस राज्यात पावसाची फार कमी शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे. आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि विदर्भात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज सकाळपासूनचं ढगाळ वातावरणाची स्थिती आहे.
Severe weather warnings issued by IMD for today, 25 June for Maharashtra.
West coast Konkan there could be isolated heavy falls today and parts of Vidarbha isolated Thunderstorms possible. pic.twitter.com/U63yG2gR0F
त्याच बरोबर विदर्भातही काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुढील काही तासांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान या ठिकाणी विजांचा कडकडाटही होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये, तसेच मोठ्या झाड्याच्या आडोशाला उभं राहू नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? इशाऱ्यानंतर सरकार कामालाकाय आहे पुण्यातील हवामान?
मागील काही दिवसांपासून पुण्यात मान्सूननं उघडीप घेतली आहे. दरम्यान पुण्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुण्यात आज कोरड्या हवामानाची नोंद झाली आहे. पुण्यात अंशतः ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. पण आज पुण्यात पावसाची शक्यता नाही. पुढील किमान पाच दिवस पुण्यात हवामानची अशीच स्थिती असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.