Home /News /mumbai /

weather update : विदर्भात पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता

weather update : विदर्भात पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता

पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण आणि हलका पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, 11 एप्रिल : राज्यात गेल्या काही (Weather in Maharashtra) दिवसांपासून भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. आता विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्व विदर्भातही (Vidharbha) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भात पुढील 4 ते 5 दिवसात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण आणि हलका पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस कमाल तापमान पारा फार वाढणार नाही, तापमानात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. तसंच मागील काही दिवसांपासून 32-33 अंश सेल्सियस दरम्यान खेळणार मंबईतील वातावर अचानक 3 अंशांनी वाढलं. त्यामुळे हवेतील दमटपणा, वाढती आर्द्रता आणि कोरोनाचा संसर्ग अशा विविध समस्यांमुळे मुंबईकर हवालदिल होताना दिसत आहे. नाशकात पावसाची हजेरी तर नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेमळी, ब्राह्मणगावसह इतर काही गावाला जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत लिलावासाठी आणलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. कोकणातील हवामानात बदल मागील काही दिवसांपासून कोकणातील हवामानही स्थिर असून येथील तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पण अजूनही कोकणातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेतील जिल्ह्यातही ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील तापमानवाढीमुळे त्रासलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या