येत्या 48 तासांत मुंबईसह या भागांत पडणार मुसळधार पाऊस

पावसाने सध्या दडी मारली असली तरी येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 07:25 PM IST

येत्या 48 तासांत मुंबईसह या भागांत पडणार मुसळधार पाऊस

मुंबई, 23 जुलै : पावसाने सध्या दडी मारली असली तरी येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पुण्यामध्येही काही प्रमाणात पावसाबदद्ल दिलासा मिळेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांत हलक्या सरी पडू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये मात्र पावसाची शक्यता दिसत नाही.

पावसाने ओढ दिल्यामुळे या खरीप हंगामात शेतकरी चिंताग्रस्त आहे पण जून ते सप्टेंबर या काळात पूर्ण देशभरातच समाधानकारक पाऊस पडेल, असं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचं म्हणणं आहे. अजून तरी शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.

VIDEO : सोलापुरात कृत्रिम पावसासाठी विमानातून ढगाची पाहणी, प्रयोग कधी?

25 आणि 26 जुलैला महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातही जोरदार पाऊस होऊ शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Loading...

देशभरात यंदा सगळीकडेच पावसाचं प्रमाण कमी आहे. कमी पावसामुळे शेतीचं नुकसान होऊ शकतं, त्याचप्रमाणे पाणीटंचाईची तीव्रताही वाढत चालली आहे. अशा स्थितीत सरकराने दुष्काळावर काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्न संसदेमध्ये खासदारांनी विचारला. त्यावर, सप्टेंबरपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल, असं उत्तर कृषिमंत्र्यांनी दिलं.

चेन्नई, हैदराबाद या शहरांना यावर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पावसाने अशीच ओढ दिली तर ही पाणीटंचाई कशी दूर होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या दोन दिवसांत चांगला पाऊस पडला तर मात्र काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

======================================================================================

VIDEO : गाडीत सीटबेल्ट न लावणाऱ्यांसाठी गडकरींचा मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...