S M L

आणखी काही दिवस मुंबईकरांना करावा लागेल 'ऑक्टोबर हिट'चा सामना

मुंबईसह राज्यात अनेक भागतील नागरिकांनी आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार.

Updated On: Oct 10, 2018 08:25 AM IST

आणखी काही दिवस मुंबईकरांना करावा लागेल 'ऑक्टोबर हिट'चा सामना

मुंबई, 9 ऑक्टोबर : मुंबईकरांना सद्या ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि तिच्या उपनगरीय शहरांचं उष्णतामान कमालीचं वाढलंय. सोमवारी हे तापमान 37 अंशांच्या वर नोंदलं गेलं. मुंबईसह राज्यात अनेक भागतील नागरिकांनी आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार असल्याचे मुंबई हवामान खात्याने म्हटले आहे.

दुपारी उन्हामध्ये बाहेर फिरायचे कसे? असा प्रश्न मुंबईकर नोकरदार वर्गासमोर निर्माण झालेला असताना मुंबईच्या हवामान खात्यानं आणखी काही दिवस मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार असल्याचं म्हटलंय. हवेच्या उष्ण झळाही त्रासदायक झालेल्या असताना मंगळवारी मुंबईच्या सांताक्रूझ येथे पारा 37.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला. तर कुलाब्याला थोडा दिलासा देत 33.5 अंश तापमानाची नोद झाली. येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत मुंबई आणि राज्यातील अनेक भागातील नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

विविध स्तरांवर जागतिक तापमानवाढ रोखण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये. या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी एका अहवालाद्वारे संयुक्त राष्ट्राने दिलाय. पर्यावरण बदलाच्या आतरदेशीय समितीने (आयपीसीने) सादर केलेल्या या अहवालात जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीचे प्रयत्न कसे निष्प्रभ होत आहेत आणि त्यामुळे झपाट्याने होत असलेल्या तापमानवाढीवर लक्ष केंद्रित केलंय. हे परिणाम अपेक्षेपेक्षा जलद गतीने समोर येत असल्याने त्याचे गंभिर परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलंय. सद्याचं तापमान 1 अंशाने वाढलंय, त्यामुळे समुद्राचा जलस्तरात वाढ झाली असून, वादळं, पूर, आणि त्यामुळे दुष्काळ असे गंभीर परिणाम समोर येताहेत. ही तापमानवाढ आणखी 3 ते 4 अंशापर्यंत वाढणार असल्याची शक्यताही या अहवालात वर्तविण्यात आली आहे.तापमानवाढीची ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर 2030 पर्यंत जागतिक तापमान ह 1.5 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल आणि आमुळे भारत आणि पाकिस्तानला जीवघेण्या उष्ण लाटांचा सामना करावा लागणार असल्याचे अहवालात म्हटलंय.

 VIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 08:25 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close