• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Weather Alert: बंगालच्या उपसागरात नवं संकट; शेतीची कामं उरण्यासाठी शेतकऱ्यांकडे अवघा एक आठवडा बाकी

Weather Alert: बंगालच्या उपसागरात नवं संकट; शेतीची कामं उरण्यासाठी शेतकऱ्यांकडे अवघा एक आठवडा बाकी

Weather Alert: आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 07 ऑक्टोबर: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं (Heavy Rainfall in Maharashtra) झोडपलं आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस (Cloudburst Rain) झाला आहे. यानंतर आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उर्वरित कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत, असा सल्ला हवामान शास्त्र विभागाच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतीतील सर्व कामे उरकण्यासाठी आता शेतकऱ्याच्या हातात केवळ एक आठवडा उरला आहे. शेतीतील कामं वेळेवर पूर्ण न झाल्यास हाता तोंडाला आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागू शकतो. हेही वाचा-फक्त 100 रुपयांत कोरोना टेस्ट; घरबसल्या अवघ्या 20 सेकंदात मिळणार रिपोर्ट दुसरीकडे आजपासून पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यासह पूर्ण घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात पूर्वेकडील जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पण कोकण आणि घाट परिसरात कोसळधार सुरूच राहणार आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: