मुंबई, 24 जून: जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी मान्सूननं दणक्यात आगमन केलं होतं. मुंबईसह संपूर्ण राज्याला मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं होतं. यानंतर आता राज्यात मान्सूनचा जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. पुढील आठवडाभर राज्यात अशीच स्थिती राहिल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांशी राज्यात मोठा पाऊस होणार नसल्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. पण दरम्यानच्या काळात मात्र उत्तरपूर्व भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून उत्तरेत मान्सूनची प्रगती खुंटली आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिमी वार्यांची दिशा लक्षात घेता, भारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता खूप कमी आहे.
12.25 Hrs, 24 Jun: As per the latest radar observation, there is Possibility of mod to intense showers over North of Daman (Guj), Modak Sagar (water catchment), Parts of Raigad districts; Roha Matheran Bhira. Also Shahapur, Murbad Talukas intense spells during 2, 3 hrs pic.twitter.com/2PuGGlmPJi
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2021
3 तासांत रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात मान्सूननं काहीसी विश्रांती घेतली असली तरी, पुढील तीन तासांत रायगड जिल्ह्यातील बहुतांशी भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्याचबरोबर शहापूर आणि मुरबाद या तालुक्यांना देखील मान्सून जोरदार झोडपून काढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-देशात डेल्टा+ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार?, तज्ज्ञांची मोठी माहिती
त्याचबरोबर, आज मुंबई आणि उपनगरात एक-दोन ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मागील चोवीस तासांत मुंबईत फारच कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील आणखी काही दिवस मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Weather forecast