Home /News /mumbai /

Weather Alert! आज मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; राज्यात 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Alert! आज मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; राज्यात 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Alert: आज मुंबईसह (Mumbai) एकूण नऊ जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red alert) जारी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहेत.

    मुंबई, 19 जुलै: गेल्या आठवड्यापासून मुंबई शहरासह उपनगरात पावसानं (Heavy rainfall) अक्षरशः कहर केला आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे मुंबईकराचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज मुंबईसह (Mumbai) एकूण नऊ जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red alert) जारी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-ठाण्यात पावसाचा कहर, तलावाचं पाणी रस्त्यावर; उल्हासनगरात कोसळला 400 मिमी पाऊस याशिवाय, पुढील तीन तासांत मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वाराही वाहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना, लांबचा प्रवास टाळण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे. हेही वाचा-Weather Forecast: बळीराजाच्या संकटात वाढ; मराठवाड्यात वाढतोय ढगफुटीचा धोका विदर्भातही कोसळणार सरी मागील काही दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं काहीसी विश्रांती घेतली आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणी एक दोनदा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पण विदर्भातील शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. आज संपूर्ण विदर्भाला आणि दक्षिण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या