मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात उन्हाचा भडका, देशात टॉप 10मध्ये 5 शहरं राज्यातली

कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात उन्हाचा भडका, देशात टॉप 10मध्ये 5 शहरं राज्यातली

वातावरणातल्या या बदलाचा परिणामही तब्येतीवर होत असतो. कोरोनाच्या संकट काळात या बदलामुळे लोकांना तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई 03 मे: अवघा महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध लढत असतानाच सूर्य आता आग ओकू लागला आहे. मे महिना सुरू झाल्याने उन्हाचा भडका उडाला असून देशातल्या सर्वाधिक तापणाऱ्या 10 शहरांमध्ये तब्बल 5 शहरं ही महाराष्ट्रातली असून अकोला देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसाचा तडाखाही बसतोय. त्यामुळे कोरोना, उन्ह आणि पाऊस असा तिहेरी मार राज्याला सोसावा लागत आहे. स्कायमेटने देशात सर्वाधिक तापमान असणाऱ्या टॉप 10 शहरांची माहिती दिली आहे. त्यात राजस्थानातलं चुरूमध्ये देशात सर्वात जास्त 45.2 एवढं तापमान नोंदलं गेलं तर दुसऱ्या क्रमांकावर विदर्भातल्या अकोल्यात 44.8 एवढ्या तापमानाची नोंदलं झाली आहे. ही आहेत महाराष्ट्रातली 5 तापणारी शहरं अकोला – 44.8 अमरावती – 44.2 परभणी - 44.2 नांदेड – 44 वर्धा – 44 कोरोनाचं संकट आल्यानंतर सुरुवातीच्या काळात उष्णतेमुळे कोरोनाला अटकाव होतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कोरोनाचा वेग कायम असल्याने ती शक्यता फोल ठरली आहे. 15 जून पर्यंत हे तापमान असंच राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातल्या अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि पाऊस होत आहे. पुढच्या काही दिवसांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातल्या या बदलाचा परिणामही तब्येतीवर होत असतो. कोरोनाच्या संकट काळात या बदलामुळे लोकांना तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. हेही वाचा - Lockdown मुळे बंद असलेल्या बिल्डिंगमध्ये 'या' आजाराचं संकट कोरोना योद्ध्याने बेवासर मृतदेहाला दिला खांदा, कर्तव्य पार पाडत दिली प्रेरणा
First published:

पुढील बातम्या