आम्ही पहिले काम करतो आणि मग मतं मागतो -मुख्यमंत्री

आम्ही पहिले काम करतो आणि मग मतं मागतो -मुख्यमंत्री

कुणी कोणताही दावा केला, तरी सत्य लोकांना ठाऊक असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

  • Share this:

17 आॅगस्ट : आम्ही पहिले काम करतो मगच जनतेकडं मतं मागतो असा टोला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन  विरोधकांना धारेवर धरलं. शहरीकरणाला भाजप प्राधान्य देत असून गेल्या 25 वर्षांत जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी दोन वर्षांत मीरा भाईंदरला दिल्याय अशी माहिती त्यांनी सांगितलं. मेट्रो असो किंवा पाण्याचा मुद्दा भाजपनं हे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

सूर्या प्रकल्पातून मीरा भाईंदरला रोज पाणी मिळेल, मेट्रोचेही काम वेगाने होत आहे. कुणी कोणताही दावा केला, तरी सत्य लोकांना ठाऊक असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

तसंच २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार. पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार. तुम्ही भाजपाला पूर्ण बहुमत द्या, तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण करू असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.

First published: August 17, 2017, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading