CM उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले फडणवीसांना प्रतिउत्तर!

CM उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले फडणवीसांना प्रतिउत्तर!

राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर: शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांसह पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकर परिषदेत कॅबिनेटमधील निर्णयांची महिती दिली. तसेच आगामी काळात राज्य सरकार कसे काम करेल याची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यासाठी 20 कोटी मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील हे सरकार सर्व सामान्य माणसाचे सरकार असेल. राज्यात कोणालाही दहशत वाटणार नाही, असे ही ठाकरे यांनी सांगितले. आतापर्यंत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणती आणि किती मदत झाली याची माहिती घेण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले असून ही माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, अशी टीका नव्या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मंत्रिमंडळ कोणाचे असते याचा त्यांनी अभ्यास करून यावा असे उत्तर दिले. दरम्यान उद्धव ठाकरे उद्या दुपारी एक वाजता मंत्रालयात जाऊन पदभार स्विकारणार आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

-छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सेवे पासून कामाला सुरुवात

-रायगड किल्ला संवर्धनासाठी 20 कोटी मंजूर

-राज्यात कुणाला दहशत वाटेल अस वागणार नाही

-हे सरकार सामान्य माणसाचे सरकार असेल

-शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करयाची नाही

-शेतकऱ्यांना मोठी मदत करणार, दोन दिवसात करणार घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 10:37 PM IST

ताज्या बातम्या