'आम्ही कराचीतल्या दर्ग्याबाहेर दाऊद इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत होतो, पण...'

'आम्ही कराचीतल्या दर्ग्याबाहेर दाऊद इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत होतो, पण...'

ही घटना 1998 मधील आहे. गेल्या काही दिवसांआधीच लकडवालाला मुंबई पोलिसांनी पटणाहून अटक केली. त्याच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या चौकशीत खळबळजनक खुलासा झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. छोटा राजनचा सगळ्यात प्रमुख विश्वासू सहकारी विकी मल्होत्राच्यासोबत 10 जणांनी कराचीतल्या दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत असल्याची माहिती एजाज लकडावालाने पोलिसांना दिली आहे. ही घटना 1998 मधील आहे. गेल्या काही दिवसांआधीच लकडवालाला मुंबई पोलिसांनी पटणाहून अटक केली. त्याच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे.

'छोटा राजनने भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या आशीर्वादाने आपली मुलगी मारियाच्या निधनानंतर दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केला. विकीच्या नेतृत्वात मी संघाचा एक सदस्य होतो, ज्यात फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचा समावेश होता आणि आम्ही एका दर्ग्याच्या बाहेर तळ ठोकला जिथे दाऊद आपल्या मुलीसाठी काही धार्मिक विधी करण्यासाठी येणार होता' तर लकडावाला स्वत: एका वेळी दाऊदचा जवळचा सहकारी पोलिसांनी पोलिसांना सांगितले.

लकडावालाने म्हणाला की, 'नेपाळमधील खासदार मिर्झा दिलशाद बेग यांनी  अखेरच्या क्षणी डी-कंपनीला माहिती दिली होती. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यावर नाना (छोटा राजन) इतका संतापला होता की त्याने त्याच वर्षी बेगचा खून केला'

इतर बातम्या - Namaste Trump Live: ट्रम्प 11.40 ला अहमदाबादला येणार, PM मोदी करणार स्वागत

मुंबई पोलिसांनी केलेल्या लक्षद्वालाच्या चौकशीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. 50 वर्षांचा लकडावाला सुमारे 20 वर्षे पोलिसांनी चकवा देत होता. त्या काळात त्याने दाऊदचा हात सोडून छोटा राजनसोबत काम सुरू केलं. देशभरात खंडणी रॅकेट सुरू करण्यासाठी स्वतःची टोळी त्याने सुरू केली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बनावट पासपोर्ट प्रकरणात मुलगी शिफाला अटक केल्यानंतर तो मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, 2002 मध्ये दाऊद आणि छोटा शकीलकडून झालेल्या बेबनावामध्ये लकडवालाचा थोडक्यात जीव बचावला. त्याच्यावर सहा वेळेस गोळ्या झाडण्यात आल्या. परंतु त्याच्या छातीला लागलेली गोळी एका तावीजला अडकली आणि तो बचावला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इतर बातम्या - अंडरवर्ल्‍ड डॉन रवी पुजारीला दणका, 15 वर्षानंतर आणलं भारतात

“माझा सहकारी सलीम पेनवाला याने मला संपर्क साधला आणि मला सांगितले की त्याला मला अजमेर येथील तावीज द्यायचे आहे. शकीलचे लोक त्याचा पाठलाग करू शकतात या भीतीने मी पेनवालाला भेटण्यापासून सावध होतो आणि म्हणून माझ्याऐवजी मी माझ्या बायकोला पाठविलं. पेनवाला भेटल्यानंतर मी तिला थेट घरी न येण्यास सांगितलं. पण ती त्याबद्दल विसरली आणि घरी परतली. ज्याने शकीलला माझा शोध घेण्यास मदत झाली. तावीज मिळाल्यानंतर दोन दिवसांनी हल्ला करण्यात आल्याचं लकडावालाने पोलिसांना सांगितलं.

माझ्या आयुष्याची बोली लागल्याचं लक्षात येताच लकडावाला कॅनडामध्ये पळून गेला, असेही त्याने अधिकाऱ्यांना सांगितलं आणि तो धर्माकडे वळल्याचंही त्याने सांगितलं. या अधिकाऱ्याने सांगितले की, गुंडांनी दाऊद आणि शकीलबद्दल काही अतिशय संबंधित माहिती उघडकीस आणली असून त्यांची चौकशी चालूच राहणार आहे.

First published: February 24, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading