Home /News /mumbai /

'जो बोला तो रेडा आम्हाला नको', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला

'जो बोला तो रेडा आम्हाला नको', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला


त्यावेळी हे सगळं सुरू होतं, आमदार जे निवडून आले होते, आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यावेळी हे सगळं सुरू होतं, आमदार जे निवडून आले होते, आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यावेळी हे सगळं सुरू होतं, आमदार जे निवडून आले होते, आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.

    मुंबई, 04 जुलै :  कामाख्या देवीला बळी दिला, असं म्हणत होते पण आता कामाख्या देवीने कुणाचा बळी घेतला. 40 रेडे पाठवले असं म्हणाले होते, पण माँ कामाख्या बोलली जो बोलला तो रेडा नको, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanth shinde speech) यांनी संजय राऊत (sanjay raut) यांना टोला लगावला. शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर झालेले आरोप आणि टिकेला सडेतोड उत्तर दिले. कामाख्या देवीला बळी दिला, असं म्हणत होते पण आता कामाख्या देवीने कुणाचा बळी घेतला. 40 रेडे पाठवले असं म्हणाले होते, पण माँ कामाख्या बोलली जो बोलला तो रेडा नको, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. अजित पवार हे मंत्रालयात सकाळी सहा वाजताच बैठका घ्यायचे. ते माझ्या खात्याच्या सुद्धा बैठका घ्यायचे. पण ते काम करायचे त्यामुळे मी काही बोललो नाही. त्यांनी 800 कोटी घेतले तरी काही बोललो नाही. पण, अजितदादांनी आणि माझी चांगली अंडरस्टँडिंग होती. त्यांनी एक नोटिंग केलं होतं. त्यानंतर त्यांनी पॅरललं नगरविकास खात्याचा हेड का केला. त्यानंतर मी आक्षेप घेतला. त्यानंतर मी लगेच माघार घेतली. मी कद्रु नाही. काम करणारी माणसं मला आवडतात. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे. पण मी कधीही काही बोललो नाही. मी लहान होतो, वरिष्ठ मंत्री मला कधीही काढू शकत होते, असंही शिंदे म्हणाले. 'आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, भास्कर जाधव आम्ही गद्दार नाही. जो काही निर्णय घेतला आहे, वैयक्तिगत मला काही स्वार्थ नव्हता. सुरुवातील मला मुख्यमंत्री करणार ही वस्तुस्थितीत होती. पण अजितदादा की कुणी तरी सांगितलं, एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री नको म्हणून सांगितलं. त्यानंतर मला सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहे. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांचा किस्सा सुरू होता, त्यावेळी मी अजितदादांना विचारला, त्यावेळी त्यांनी पक्षातूनच विरोध होता असं सांगितलं गेलं. त्यानंतर मी विसरलो.नंतर महाविकास आघाडी सरकार आले आणि शरद पवार यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा होतो. आम्ही सत्तेच्या किंवा पदासाठी लालची नव्हतो. मी सगळं विसरून काम सुरू केलं, असंही शिंदे म्हणाले. 'त्यावेळी हे सगळं सुरू होतं, आमदार जे निवडून आले होते, आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.  पुढे निवडणूक झाली तर कसं करायचं. शिवसेना आणि भाजप युती म्हणून आपण लढलो होतो. आता काँग्रेससोबत आहे. निवडणूक कशी लढायची. मी पाच वेळा हा प्रयत्न केला होता. पण आम्हाला अपयश आले. केसरकर हे साक्षीदार आहे. त्यानंतर अडीच वर्षांमध्ये वेगवेगळे अनुभव आहे. सावरकरांबद्दल बोलू शकत नव्हतो. काँग्रेसने टीका केली, त्याला उत्तर देऊ शकत नव्हतो. हिदुत्त्वाच्या मुद्यावर बोलू शकत नव्हतो. कालही आम्ही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचं आणि दिघेसाहेबांचे शिवसैनिक आहोत. कुणी व्यक्तिगत घेऊ नये, असंही शिंदे म्हणाले.  
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या