Home /News /mumbai /

कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं उत्तर, मुंबईवरील वादग्रस्त टीपण्णीवर म्हणाल्या...

कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं उत्तर, मुंबईवरील वादग्रस्त टीपण्णीवर म्हणाल्या...

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेतली आहे.

    मुंबई, 4 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या वादात सापडली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासावरून राज्य सरकारवर आरोप करणारी कंगना नंतर मात्र थेट मुंबई पोलिसांवरच घसरली. तसंच कंगनाकडून मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरसोबत करण्यात आली. त्यानंतर कंगनावर चहुबाजूने टीकेची झोड उठली आहे. अशातच आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 'एखाद्याच्या मताशी आपण सहमत नसूही, पण लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याच्या अधिकाराचे आपण रक्षण केले पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, प्रेस-स्वातंत्र्य कोणी दडपू शकत नाही. एखाद्याच्या मताविषयी प्रतिवाद असू शकतो, पण टीका करणाऱ्याच्या पोस्टरला चप्पलेने मारणं हे योग्य नाही,' असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे कंगनाविरोधात मुंबईसह महाराष्ट्रातून टीकेचा सूर उमटत असतानाच अमृता फडणवीस यांनी मात्र तिच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. त्यामुळे या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. 'कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.' त्यावर मी 9 सप्टेंबरला मुंबईत येते आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं थेट आव्हानच कंगनाने दिलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amruta fadanvis, Kangana ranaut

    पुढील बातम्या