मुंबई, 27 फेब्रुवारी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मनसेने शिवाजी पार्क येथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र यावेळी त्यांना मास्क घातला नव्हता, यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. 'मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय', असं म्हणत राज यांनी काढता पाय घेतला. (request of Thackary governments a senior minister in the Raj Thackeray )
राज ठाकरेंनी मास्क लावला नव्हता, यामुळे एका काँग्रेसच्या नेत्याने काळजी व्यक्त केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, राज ठाकरे हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी मास्क लावावा. ते आमच्या विनंतीला मान देणार नाही व मास्क ही लावणार नसतील तर भविष्यात कोरोना झाला तर राज्य सरकार जबाबदार नसेल असे मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे व्यक्त केले.
हे ही वाचा-कोरोनामुळं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम, पुन्हा जाहीर झाली नवी तारीख
मराठी भाषा दिवसाच्या (Marathi Bhasha Din) निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji Park) आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थिती लावली. यावेळी विविध मुद्द्यांवरुन त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. शिवजयंती किंवा मराठी भाषा दिनाच्या दिवशी कार्यक्रमाला गर्दी करु नये, या सरकारच्या निर्देशाचाही त्यांनी समाचार घेतला. यांना राजकीय कार्यक्रमांना मंत्र्यांनी केलेली गर्दी चालते. इतकंच वाटतं तर निवडणुका पुढे ढकला, असा शब्द राज ठाकरेंनी टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.