पावसाळ्यात 'या' ठिकाणांवर आहे पर्यटनासाठी बंदी

पावसाळ्यात 'या' ठिकाणांवर आहे पर्यटनासाठी बंदी

पावसाळ्यात होणारी पर्यटकांची गर्दी आणि धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रायगड, कर्जत, खोपोलीतील तीन पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे

  • Share this:

मुंबई, ता.6 जुलै : पावसाळ्यात होणारी पर्यटकांची गर्दी आणि धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रायगड, कर्जत, खोपोलीतील तीन पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. 5 जुलै 2018 ते 4 सप्टेंबर 2018 कालावधीसाठी ही बंदी राहिल. कर्जतच्या उपविभागीय दंडाधिका-यांनी हे आदेश काढले आहेत.

या पर्यटन स्थळांवर आहे बंदी

खालापूर - आडोशी धबधबा

खालापूर - आडोशी पाझर तलाव

खोपोली - झेनिथ धबधबा

या तीनही ठिकाणांवर सुट्ट्यांमध्ये पुण्या मुंबईच्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. वाहनांची गर्दी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं या ठिकाणांवर अनेक प्रश्न निर्माण होतात. वाहतूकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना ही तिनही ठिकाणं धोक्याची केंद्र ठरली आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत आणि पर्यटक सूचनांचं पालन करत नाही त्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे.

हेही वाचा...

मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले ? 

 दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी

 नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 08:45 PM IST

ताज्या बातम्या