Home /News /mumbai /

Mumbai Water Theft: मुंबईत 3 हजार कोटींच्या पाण्याची लूट; भाजप आमदार आशिष शेलारांचा गंभीर आरोप, SIT चौकशीची मागणी

Mumbai Water Theft: मुंबईत 3 हजार कोटींच्या पाण्याची लूट; भाजप आमदार आशिष शेलारांचा गंभीर आरोप, SIT चौकशीची मागणी

3000 crore Water theft in Mumbai: कायद्याची अंमलबजावनी होत नसल्यामुळे मुंबई सारख्या शहरात टॅंकर माफियांचे फावले असून 3000 कोटी रूपयांची पाण्याची लूट होत आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

मुंबई, 6 जानेवारी : मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी चोरी (Water theft in Mumbai) होत असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केला आहे. कायद्याची अंमलबजावनी होत नसल्यामुळे मुंबई सारख्या शहरात टॅंकर माफियांचे फावले असून 3000 कोटी रूपयांची पाण्याची लूट होत आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी भूजल सर्वेक्षण आयुक्त यांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबईतील विहिरीमधून पाण्याचा उपसा अनाधिकृतपणे होत आहे. याची SIT मार्फत चौकशी (SIT inquiry) करण्यात यावी. ज्यांनी अनाधिकृतपणे पाण्याची लूट केली आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई करण्यात यावी अशीही मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी पत्रात? आपल्या पत्रात आशिष शेलार यांनी म्हटलं, मला प्रसिध्दी माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई शहरात 19,000 पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत ज्यापैकी 12,500 बोअरवेल आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 251 जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 216 अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब समोर आले आहे. यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्यक आहे. मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक आहे. म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करण्यात यावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो आहे. या एसआयटीने बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. वाचा : सुरक्षेच्या कारणामुळे मोदींची रॅली रद्द, चंद्रकांत पाटलांचा पंजाब सरकारवर निशाणा 1. SIT मार्फत तपास मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात वापर असलेल्या 19,000 हून अधिक विहिरींमधूर प्रत्येकी किती प्रमाणात बेकायदेशीर पाणी उपसा सध्या होत आहे व तो किती असायला हवा. 2. ज्यांनी कोणत्याही परवानगी किंवा नियमांशिवाय भूजलाचा अतिरीक्त शोषण करीत पाणी उपसा केला आहे या प्रकरणी दोषी आढळतील अशांवर तातडीने एफआयआर दाखल करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. 3. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झाला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्यात यावे. 4. तसेच मुंबई आणि मुंबई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्यकता लक्षात घेऊन आवश्यक असणारे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सर्व महापालिकांनी स्वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्वयीत करण्याबाबत कार्यवाही करावी.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ashish shelar, Mumbai, Water

पुढील बातम्या