कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात साचले पाणी!

कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात साचले पाणी!

शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात तुडूंब पाणी साचलं आहे. यामुळे शनीवारी सत्र न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून आलं.

  • Share this:

मुंबई, ता.७ जुलै : शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात तुडूंब पाणी साचलं आहे. यामुळे शनीवारी सत्र न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळं अनेक अशिलांना त्यांचा फटका बसला. हा भाग अतिशय गजबजलेला आहे. आणि अतिक्रमणामुळे नाल्यांवरही बांधकाम झालं आहे. त्यामुळं पाण्याचा योग्य निचरा होत नाही.

सनी लिओनच्या बायोपिकचा ट्रेलर पाहिलात का?

मुंबई-गोवा हायवे बंद, काय आहे कोकणातल्या पावसाची स्थिती?

शुक्रवारी रात्रीपासून संततधार सुरु असल्याने कल्याण आणि डोंबीवलीतल्या सखल भागात पाणी साचलं. छोटे दुकानदार, फेरीवाले आणि स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला.  पावसामुळे अनेक वकिलही उपस्थित नव्हते त्यामुळे अनेक सुनावण्या लांबणीवर पडल्या. परिणामी, भर पावसात न्यायालयात पोहोचलेल्या अनेकांना परतीचा मार्ग पत्करावा लागला. न्यायालयालगतच्या दुकानांमध्येही पाणी शिरल्याने साचलेले पाणी मशिनद्वारे काढाण्याची वेळ दुकानदारांवर आली.

मल्टिप्लेक्सच्या मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, माघार घेण्यास मनसेचा नकार

आज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

रात्रीपासून धुव्वाधार पावसामुळे कल्याण बस स्थानकातही तलाव साचला होता. कल्याण बस स्थानकात प्रथमच एवढे पाणी साचल्याची प्रतिक्रिया काही स्थानिकांनी न्यूज१८ लोकमतला दिली. बस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेक चाकरमान्यांचे हाल झाले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 04:46 PM IST

ताज्या बातम्या