मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, महिनाभर पाण्यासाठी होतील हाल

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, महिनाभर पाण्यासाठी होतील हाल

मुंबईकरांनी गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून कऱण्यात आलं आहे.

मुंबईकरांनी गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून कऱण्यात आलं आहे.

मुंबईकरांनी गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून कऱण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च : मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाण्यातील जलबोगद्याच्या दुरुस्तीचं काम ३१ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे ३१ मार्चपासून पुढचे ३० दिवस मुंबई शहर आणि उपनगरात पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली जाईल अशी माहिती मुंबई पालिकेने दिलीय.

मुंबई शहर आणि उपनगरात केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी जवळपास ६५ टक्के इतका पाणीपुरवठा हा भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून करण्यात येतो. याच्या जलबोगद्यास ठाण्यात खोदकामामुळे हानी पोहचली आहे. यामुळे होत असलेल्या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी जलबोगदा पूर्ण बंद केला जाणार आहे. जलबोगद्याची दुरुस्ती सुरू असताना पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी पर्यायी व्यवस्था सुरू करण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत.

दर्शन सोळंकी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकेवर सुसाइड नोट

भांडुप संकुलात जितके पाणी प्रक्रिया होते तितके पोहोचवणे शक्य नसल्यानं पर्यायी व्यवस्थेचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबई पालिकाक्षेत्र आणि मुंबई पालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून कऱण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai