मु्ख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाणीबिलाची थकबाकी? आता BMCनेच केला खुलासा

मु्ख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाणीबिलाची थकबाकी? आता BMCनेच केला खुलासा

'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलाबाबत थकबाकी असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलाबाबत थकबाकी असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. या वृत्तानंतर राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेने आता हा दावा खोडून काढला आहे.

वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी 'निरंक' आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही, असं सांगण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

हेही वाचा - काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत

दरम्यान, या पाणीबिलाशिवायच राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढीव लाईट बिलांचाही प्रश्न चर्चेत आहे. आमच्याकडून अवास्तव लाईट बिल आकारण्यात येत असल्याचा आरोप अनेक ग्राहकांनी केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 14, 2020, 6:27 PM IST

ताज्या बातम्या