Home /News /mumbai /

VIDEO: नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स

VIDEO: नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स

Watch Video: एक गोरेगाव येथे नेस्को (Nesco COVID-19 centre) मध्ये कोविड केंद्र उभारण्यात आलं. या केंद्राला आता एक वर्ष पूर्ण झालं.

    मुंबई, 04 जून: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. सध्या मुंबईत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर उपाययोजना आखल्या. जवळपास गेल्या वर्षीपासून कहर माजवलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनासह डॉक्टर, नर्स, पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. गेल्या दीड वर्षापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली भूमिका चोख बजावत आहे. गेल्या वर्षी याच काळात मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेनं अनेक ठिकाणी कोविड केअर केंद्र उभारले. त्यातच एक गोरेगाव येथे नेस्को (Nesco COVID-19 centre) कोविड केअर केंद्र उभारण्यात आलं. या केंद्राला आता एक वर्ष पूर्ण झालं. या केंद्राला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केंद्रात (Healthcare Professionals) डॉक्टर, नर्स आणि रुग्णांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे. या डान्सचा (Watch Video) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को कोविड -19च्या केंद्राला एक वर्ष पूर्ण झालं. केंद्राला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 2 जूनला आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी एक करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या वॉर्डमध्ये जाऊन डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पीपीई किट घालून सर्व आरोग्य सेवा कर्मचारी तणावमुक्त नाचताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा कार्यक्रम केवळ एक वर्ष पूर्ण झाला म्हणून नव्हे तर डॉक्टर आणि नर्संना काही काळासाठी तणावमुक्त करण्यासाठी ही आयोजित केला होता. गेल्या वर्षीपासून कोविड-19 हे महामारीचं संकट आल्यापासून आरोग्य सेवा कर्मचारी अत्यंत जोखीमनं काम करताना दिसत आहेत. एनआयए या वृत्तसंस्थेनंही या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ANI नं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर या व्हिडिओला जवळपास 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai case

    पुढील बातम्या