लोकल येताच अल्पवयीन मुलीने मारली ट्रॅकवर उडी, पाहा हा VIDEO

लोकल येताच अल्पवयीन मुलीने मारली ट्रॅकवर उडी, पाहा हा VIDEO

  • Share this:

बदलापूर, 11 फेब्रुवारी : बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर रेल्वे स्थानकात बदलापूर लोकल शिरत असताना अचानक एक मुलगी अचानक फलाटावरून ट्रॅकवर उतरली. यावेळी मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारले. मात्र, तरुणीला लोकलची हलकीशी धडक बसली आणि ती खाली पडली.

यानंतर मोटरमनने या मुलीला बाहेर काढत पाणी पाजून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिच्या चौकशीत ही मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आल्यानं रेल्वे पोलिसांनी तिच्या पालकांना बोलावून समजूत काढून मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

रेल्वे रूळ ओलांडत होते मूकबधीर मायलेक, लोकलच्या धडकेत आईचा मृत्यू

दरम्यान, पुणे-लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एका मूकबधीर आईचा मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यातील कान्हे रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या अपघातात तिचा सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून मृत्यूशी झुंज देत आहे.

हा अपघात कान्हे रेल्वे स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास घडला. धावत्या पुणे लोणावळा लोकलची धडक लागून 26 वर्षीय रेखा शेलार यांचा जागीच मृत्यू झाला असून तिचा सात वर्षीय लहान मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला अपघातात विराज शेलार हा सात वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेली महिला तसंच तिचा मुलगा हे दोघेही मूकबधीर असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना लोहमार्गावरून भरधाव येणाऱ्या रेल्वेचा त्यांना अंदाज आला नाही. मोटरमनने अनेक वेळा हॉर्न वाजवला पण या मायलेकांना धावत्या रेल्वेचा कुठल्याही प्रकारचा भास झाला नाही. त्यामुळे दोघांनाही रेल्वेची जोरदार धडक लागली यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर विराज गंभीर जखमी झाला.

जखमी विराजला स्थानिक रहिवाशांनी उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. विराजची ही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टर महेश कुदळे यांनी दिली आहे.

First published: February 11, 2020, 11:12 PM IST

ताज्या बातम्या