मुंबई मेरी 'जाम'! भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी केला रिक्षातून प्रवास

मुंबई मेरी 'जाम'! भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी केला रिक्षातून प्रवास

'मैं हूं घोडा... ये हैं गाडी... मेरी रिक्षा सबसे निराली..' असं म्हणत बाबुल सुप्रियो यांनी आपल्या या प्रवासाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : मुंबई शहरात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशात सध्या पावसामुळे सुद्धा अनेक ठिकणी ट्रॅफिक जाम झालेलं दिसून येतं. त्यामुळे सामान्य व्यक्ती ते अगदी सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांनाही या समस्येला सध्या सामोरं जावं लागत आहे. असाच काहीसा अनुभव भाजप केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना आला. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये त्यांची कार अडल्यानंतर एअरपेर्टला वेळेवर पोहेचता यावं यासाठी त्यांनी चक्क ऑटो रिक्षानं प्रवास केला. त्याच्या या रिक्षा प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाबुल सुप्रियो मुंबई एअरपेर्टला जात असताना ट्रॅफिकमध्ये अडकले. पण त्यांना फ्लाइटच्या वेळेत पोहोचणं गरजेच होतं. त्यामुळे त्यांनी यामध्ये वेळ न घालवता रिक्षातून प्रवास केला. यावेळी त्यांनी त्यांचा हा अनुभव एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी 'मेरी रिक्षा सबसे निराली... मला खात्री आहे की मी रिक्षातून माझ्या फ्लाइटच्या वेळेआधी नक्कीच पोहोचू शकेन.'

TRP मीटर : प्रेक्षकांची पसंती कायम, तरीही 'या' मालिकेला मिळाली बढती

या व्हिडीओमध्ये सुप्रियो सांगतात, 'माझी कार ट्रॅपिक जाममध्ये अडकली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत मी रिक्षातून प्रवास करायचं ठरवलं. मी माझ्या स्ट्रगलिंगच्या काळात रिक्षातून प्रवास करत असे. 1992च्या दरम्यानचा तो काळ होता. आज पुन्हा एकदा रिक्षामध्ये बसल्यावर मला किशोर कुमार यांचं एक गाणं आठवलं. 'मैं हूं घोडा... ये हैं गाडी... मेरी रिक्षा सबसे निराली..' मुंबईमध्ये रिक्षातून प्रवास करणं माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे. मी जुन्या आठवणीत रमलो.'

हिमेश रेशमियानंतर बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकानं दिली रानू यांना गाण्याची ऑफर

राजकीय क्षेत्रात पाउल टाकण्यापूर्वी बाबुल सुप्रियो यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. त्यांनी मुंबईतील रिक्षा प्रवासाचा हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केल्यानंतर 14 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

सोनाली कुलकर्णीच्या 'विक्की वेलिंगकर'ला तुम्ही भेटलात का?

=============================================================

मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

First published: September 19, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या