अमृता फडणवीस यांचं नवं गाण ‘तू मंदिर तू शिवाला’ प्रदर्शित, कोरोना योद्ध्यांना संगीतातून मानवंदना

अमृता फडणवीस यांचं नवं गाण ‘तू मंदिर तू शिवाला’ प्रदर्शित, कोरोना योद्ध्यांना संगीतातून मानवंदना

आपल्या गाण्यातून नेहमीच रसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला आशिष मोरे यांनी संगीत दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी देशातील अनेक 'कोरोना कमांडो' दिवसरात्र एक करून झटत आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पालिका कर्मचारी, इतर सरकारी कर्मचारी कोरोनाच्या या लढाईत पाय रोवून उभे आहेत. दरम्यान या सर्वांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक नागिरिकांनी देखील अशाच प्रकारे संगीताच्या माध्यमातून या कोरोना कमाडोंना मानवंदना दिली आहे. आता यामध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी देखील या कोरोना योद्ध्यांना मानवंदना अर्पण करण्यासाठी गाण्याचा वापर केला आहे. त्यांनी ‘तू मंदिर, तू शिवाला’ हे गाणं गायलं आहे. आपल्या गाण्यातून नेहमीच रसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला आशिष मोरे यांनी संगीत दिलं आहे. राजू सपकाळ यांनी हे गाणं लिहिलं असून कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना त्यांनी हे गाणं समर्पित केले आहे.

देशभरामध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 25 मार्चपासून लॉकडाऊनची सुरूवात झाली आहे. 3 मे रोजी लॉकडाऊचा दुसरा टप्पा संपणार असून 4 तारखेपासून तिसरा टप्पा देखील सुरू होणार आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मेपर्यंत असणार आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवायचे असेल आणि कोरोना योद्ध्यांना सहकार्य करायचे असेल तर सरकारने आखून दिलेल्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 2, 2020, 8:15 PM IST

ताज्या बातम्या