मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सोशल मीडियावर चालवित होता अल्पवीयन मुलींच्या अश्लील व्हिडीओच रॅकेट; मुंबईतील अभिनेत्याला अटक

सोशल मीडियावर चालवित होता अल्पवीयन मुलींच्या अश्लील व्हिडीओच रॅकेट; मुंबईतील अभिनेत्याला अटक

मुंबईतील हा अभिनेता अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे व्हिडीओ शूट करून घेत होता आणि...

मुंबईतील हा अभिनेता अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे व्हिडीओ शूट करून घेत होता आणि...

मुंबईतील हा अभिनेता अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे व्हिडीओ शूट करून घेत होता आणि...

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 25 ऑक्टोबर : मुंबईतील वाढणाऱ्या क्राइमच्या घटना या चिंता वाढविणाऱ्या आहेच. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीबीआयने मुंबईतील स्मॉल टाइम अभिनेत्याला पास्को आणि आयटी अॅक्टअंतर्गत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी सोशल मीडियावर तब्बल 1000 अल्पवयीन मुलींच्या संपर्कात होता. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेला हा स्मॉल टाइम अभिनेता खरं तर  एक International Child Abuse रॅकेटशी संबंधित होता. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी स्माल टाइम अभिनेता स्वत:ला चित्रपटातील स्टार सांगत सोशल मीडियावर 10 ते 16 वर्षांच्या अल्पवयीने मुलींशी संपर्क करीत होता. त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी देईल, असं सांगत त्यांची फसवणूक करीत होता. यानंतर या अल्पवयीन मुलींकडून त्यांचे व्हॉट्सअॅप नंबर घेऊन त्या मुलींना पोर्ट फोलिओ पाठविण्याच्या नावावर ऑब्जेक्शनेबल व्हिडीओ आणि फोटो मागत असे. अनेकदा या अल्पवयीन मुलांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याकडून ऑब्जेक्शनेबल व्हिडीओ बनवून घेत होतो आणि हे व्हिडीओ आणि फोटो अमेरिका, युरोप आणि साऊथ एशियातील कस्टमर्लला विकत होता. हे ही वाचा-लग्नसंस्थेवर विश्वास नाही, केवळ व्हिसा मिळविण्यासाठी केलं लग्न - राधिका आपटे सीबीआयला मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर काही वेळापूर्वी मुंबईतील या घरात छापेमारी करण्यात आली. यावेळी अभिनेत्याचा मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यात आला. याशिवाय परदेशीतील काही ग्राहकांची यादी सीबीआयला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अभिनेत्याने टेलिव्हीजनच्या अनेक मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.
First published:

Tags: Actor, Mumbai

पुढील बातम्या