03 मार्च : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात विशेष पीएमएलए कोर्टाने अजामीनपात्र वाॅरंट जारी केलं आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी विरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट काढण्याची मागणी करणारा अर्ज ईडीने विशेष ईडी कोर्टात सादर केला होता.
तिनदा समन्स बजावूनही नीरव मोदी आणि मेहूल चौकशीला हजर राहिले नाहीत आणि चौकशीत कोणतंही सहकार्य न केल्याचा ईडीनं कोर्टात आरोप केला होता. तसंच नीरवनं आत्तापर्यंत दोनदा ई मेल करुन मला ई मेलवर प्रश्न विचारा असं म्हटलं आहे, पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तसं शक्य नसल्याचं ईडीनं कोर्टाला सांगितलं होतं.
नीरव आणि मेहूलनं केलेल्या घोटाळ्यात भारतीय पैशांच्या अपहार झाला आहे. त्यामुळे या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारांचा माग काढण्यासाठी नीरवची चौकशी करणं अतिशय आवश्यक आहे असं ईडीनं म्हटलं. त्यासोबतच "letter of undertaking" देण्याच्या प्रक्रियेत नीरवनं हस्तक्षेप केला आहे असाही नीरववर ईडीनं आरोप ठेवला होता.