Home /News /mumbai /

भिवंडीत गोदामावर छापा, तब्बल 11 कोटींचा अवैध साठा जप्त

भिवंडीत गोदामावर छापा, तब्बल 11 कोटींचा अवैध साठा जप्त

भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरात एका गोदामात कोट्यवधी रुपयांचा विना परवाना बनविलेला औषध साठा असल्या बाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

    रवी शिंदे, प्रतिनिधी भिवंडी, 03 जानेवारी : भिवंडीमध्ये विना परवाना औषध साठवलेल्या गोदामावर छापा टाकण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ठाणे पथकाने केलेल्या या कारवाईत 11 कोटी रुपयांचा विना परवाना बनविलेलं औषध साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरात एका गोदामात कोट्यवधी रुपयांचा विना परवाना बनविलेला औषध साठा असल्या बाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध विभागाचे कोकण सह आयुक्त व्ही टी पौनीकर, सहाय्यक आयुक्त एम आर पाटील, औषध निरीक्षक आबासाहेब रासकर यांच्या पथकाने 27 डिसेंबर रोजी काल्हेर येथील पृथ्वी कॉम्पलेक्स येथील झोएटीस इंडिया ली ( Zoetis India Ltd ) या गोदामातील औषध साठ्याची तपासणी केली. तेव्हा तिथे हिमाचल प्रदेश येथील ट्रिसिस व्हेंचर्स (Trisis Ventures) या उत्पादकाने विना परवाना उत्पादन केलेला विरकोन एस ( Virkon S ) हे पावरफुल ब्रॉड स्पेक्ट्रम व्हीर्युसिडल डिसिनफॅक्टन ( Powerful Broad Spectrum Virucidal Disinfectant ) या बुरशी आणि तत्सम ठिकाणी फवारणीकरीता वापरण्यात येणाऱ्या जंतुनाशक औषधाचा साठा आढळून आला. या औषधांचे नमुने तपासले असता सदर कंपनीने या औषधाचे उत्पादन विना परवाना केले असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर अन्न  आणि औषध प्रशासन विभागाकडून गोदामातील 11 कोटी 11 लाख 69 हजार 365 किमतीचा साठा जप्त केला असून कंपनी विरोधात औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 18 ( क ) चे उल्लंघन केल्या प्रकरणी भिवंडी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या गुन्ह्यात कायद्यानुसार 3 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद असल्याची माहिती औषध निरीक्षक आबासाहेब रासकर यांनी दिली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Bhiwandi

    पुढील बातम्या