• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • भिवंडी इमारत दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू, 7 जणांना सुखरुप काढले बाहेर

भिवंडी इमारत दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू, 7 जणांना सुखरुप काढले बाहेर

भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील हरिहर कंपाऊंड इथं गोदाम असलेली एक मजली इमारत आज सकाळी कोसळली.

  • Share this:
भिवंडी, 01 फेब्रुवारी : भिवंडीमध्ये (Bhiwandi) गोदाम असलेली एक मजली इमारत कोसळल्याची ( building collapsed) दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.  एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील हरिहर कम्पाऊंड इथं गोदामअसलेली एक मजली इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीमध्ये 10 कामगार अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी भिवंडी अग्निशमन केंद्राचे 3 फायर वाहन दाखल झाले होते. दुपारपर्यंत बचावकार्य सुरू असताना 7 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. परंतु, एका सुरक्षारकाचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सौरभ त्रिपाठी असं मृत कामगाराचे नाव आहे. या गोदाम सौरभ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तर सुनील कुमरा, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केणी आणि शैलेश तरे या कामगारांना ढिगाराखालून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. जखमी कामगारांना तातडीने आजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षा, ठाणे अग्निशमन केंद्र तसंच ठाणे आपत्ती प्रतिसाथ पथक (TDRF) मदतीसाठी पोहोचले होते. तसंच NDRF पथक मुंबईतून भिवंडीत दाखल झाले होते. अखेर संध्याकाळपर्यंत अडकलेल्या 7 कामगारांना बाहेर काढण्यात आल्यानंतर मदतकार्य थांबवण्यात आले.
Published by:sachin Salve
First published: