Home /News /mumbai /

बावळट म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना रुपाली चाकणकर यांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या...

बावळट म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना रुपाली चाकणकर यांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या...

बबनराव लोणीकर, राम कदम हे काय बोलले होते, त्यांचं काय झालं? यावरही चित्रा वाघ यांनी बोललं पाहिजे, हे जरा बरं ठरेल

    मुंबई, 05 फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याचा प्रयत्न घडला. पीडित तरुणीही मृत्यूशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे.  रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत असताना चित्रा वाघ यांची जीभ घसरली. त्यांच्या या टीकेला रुपाली चाकणकर यांनी जशास तसे उत्तर दिले. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. 'भाजपची सत्ता येईल म्हणून चित्रा वाघ यांनी पक्षप्रवेश केला होता. पण सत्ता न आल्यामुळे त्यांच्या हाती काहीच न आले. त्यामुळे आता चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे त्या तसं काही बोलत असतील, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. तसंच, सध्या पीडित मुलीला वाचवणे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्यावर काही बोलण्यात कोणताही अर्थ नाही. परंतु, बबनराव लोणीकर, राम कदम हे काय बोलले होते, त्यांचं काय झालं? यावरही चित्रा वाघ यांनी बोललं पाहिजे, हे जरा बरं ठरेल. मुळात त्या ओव्हरस्मार्ट आहे, असं टोलाही रुपाली यांनी लगावला. त्याचबरोबर, वर्धा जळीत प्रकरणात मी शाब्दिक राजकारण करत नाही. मी स्वत : रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर सरकारकडून रुग्णालयाला तातडीने आर्थिक मदतही पोहोचवली आहे. पीडित मुलीचा जीव वाचवा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रयत्न करत आहे. चित्रा वाघ पहिल्यांदा म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत करणार नसतील, आम्ही मदत करू. यात पीडितेला भाजपने मदत करण्यात कुणाचीही हरकत नाही. पीडितेचा जीव वाचला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली होती मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात महिला वरील ह्या दुर्दैवी घटना घडत आहे. राज्य सरकार या घटना रोखण्यासाठी अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती.  सरकारकडून केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. पीडित मुलीला सरकारकडून एकही रुपया दिला नाही. रुग्णालयात पीडित मुलीच्या आई वडिलांना रुग्णालयातून पैसे मागत आहे, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला होता. तर सरकारकडून मुलीचा खर्च होत नसेल तर भारतीय जनता पक्ष हा खर्च उचलणार असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांच्याकडून राजकारण, चाकणकर यांचा पलटवार चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं. 'गृहमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला उपचारासाठी ४ लाखांची मदत दिली आहे. चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राजकारण आणलं असल्याची टीका चाकणकर यांनी केली. तसंच, ऑरेंज सिटी रुग्णालयाची डायरेक्टर डॉ.अनुप मराल यांनी सुद्धा हॉस्पिटलला चार लाख रुपयाची  मिळाल्याची कबुली दिली असून कुटुंबाकडून कोणताही पैसा घेतला जाणार नसल्याचं सांगितलं. रुपाली चाकणकर बावळट, चित्रा वाघ संतापल्या चाकणकर यांच्या प्रत्युत्तरानंतर चित्रा वाघ यांना संताप अनावर झाला. चाकणकर ही बाई बावळट आहे, तुम्हाला छापायचं असेल तर खुशाल छापा, असं सांगत चित्रा वाघ  यांनी जोरदार पलटवार केला. तसंच, ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेला 11 वाजून चार मिनिटांपर्यंत पीडितेच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर 10 मिनिटांनी पैसे जमा झालेत. या प्रकरणी दोन दिवसांपासून सरकार घोषणा करत आहे.  लाज नाही वाटत काय खोटं बोलायला. सरकारचा हा खोटारडेपणा होता, तो जनतेपुढं आणणार, असल्याचंही वाघ म्हणाल्या. विशेष म्हणजे, चित्रा वाघ या आधी राष्ट्रवादीत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतून गेल्यानंतर त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पीडित  शिक्षिकेची प्रकृती जैसे थे - डॉ.अनुप मराल   दरम्यान, पीडित तरुणीच्या प्रकृतीबद्दल आरेंज सिटी हॉस्पिटलचे डॉ. अनुप मराल यांनी मेडिकल बुलेटिन जाहीर केलं. पीडित तरुणीची  प्रकृती जैसे थे आहे. पण ती उपचाराला प्रतिसाद देत असून तिच्या तब्बेतील सुधारणा नाही. युवती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असून ती बोलण्याचा देखील प्रयत्न करत आहे. तज्ञ डॉक्टर आणि राजकीय नेत्यांनी रुग्णालयात येऊन युवतीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे. सरकारतर्फे ४ लाख रुपयांचा ऍडव्हान्स रुग्णालयाला मिळाला आहे. राज्य सरकार युवतीच्या तब्येती बाबत संपर्कात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Wardha, Wardha news

    पुढील बातम्या