वाहन चालकांनो सावधान! ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पाठ करावी लागले ‘ही’ प्रतिज्ञा

वाहन चालकांनो सावधान! ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पाठ करावी लागले ‘ही’ प्रतिज्ञा

आता फक्त टेस्ट देऊन मिळणार नाही ड्रायव्हिंग लायसन्स तर घ्यावी लागेल प्रतिज्ञा.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : वाहन चालकांसाठी आरटीओच्या वतीनं नेहमीच नवनवे नियम काढले जातात. एकीकडे वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केल्यानंतर आता एक आगळा वेगळा उपक्रम राज्य परिवहन विभागाकडून राबवण्यात येणार आहे. वाहन चालविण्याकरिता शिकाऊ किंवा पक्का परवाना काढण्यासाठी आता फक्त सराव चाचणी नाही तर वाहतूक पालनाच्या प्रतिज्ञाही घ्यावी लागणार आहे. ही प्रतिज्ञा घेतल्यानंतरच परवाना मिळणार आहे.

राज्य परिवहन कार्यालयाकडून वाहन परवाना काढणाऱ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याआधी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती, आता मुंबईतही हा नियम लागू करण्यात येणार आहे.

वाचा-छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा, पाहा VIDEO

परवाना काढताना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीच्या दृष्टीने या प्रक्रियेत प्रतिज्ञेचा समावेश करण्यात आला आहे. पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट (पीसीजीटी) या संस्थेने मराठी आणि इंग्रजीत याचा नमुना तयार केला आहे. त्यामुळं आता प्रत्येकाला परवाना मागताना शपथ ग्रहण करावी लागणार आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकाराचा वाहन परवाना असल्यास ही प्रतिज्ञा म्हणावी लागणार आहे. दरम्यान प्रत्येक आरटीओचे नियम वेगळे असल्यामुळं हा नियम लागू व्हावा असे सांगण्यात आले आहे.

याआधी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी 'आरटीओ'मध्ये चाचणी देणे बंधनकारक असते. ही चाचणी मोटार वाहन निरीक्षकांसमोर घेण्यात येते. त्यासाठी संबंधित उमेदवाराला आपले वाहन 'आरटीओ' कार्यालयात आणून त्यावर चाचणी द्यावी लागते. आता चाचणी बरोबर ही प्रतिज्ञा पाठ करून शपथ ग्रहण करावी लागणार आहे.

वाचा-नोटबंदीची 3 वर्षे, देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग की उभारी?

अशी असणार आहे ही प्रतिज्ञा

वाहन चालकांना परवाना काढताना, “मी शपथ घेतो की या देशाचा सुजाण नागरिक असल्यामुळं मी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी शपथ घेतो की दुचाकी चालवताना मी हेल्मेटचा वापर करेन. गाडी चालवताना फोनचा वापर करणार नाही. तसेच, अवघड वळणांवर गाडी ओव्हरटेक करण्यासाठी गती वाढवणार नाही. दारू पिऊन गाडी चालवणार नाही”, अशी शपथ घ्यावी लागणार आहे.

वाचा-अजिंक्य रहाणेनं चिमुकलीचा फोटो शेअर करून सांगितलं नाव

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या