• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'खिश्यात कधी टाकता वाट पाहतोय', मलिकांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

'खिश्यात कधी टाकता वाट पाहतोय', मलिकांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

 'मला माहिती नव्हते की त्यांचा खिसा एवढा मोठा आहे. मी वाट पाहतोय की त्यांनी मला त्यांच्या मोठ्या खिश्यात टाकावं'

'मला माहिती नव्हते की त्यांचा खिसा एवढा मोठा आहे. मी वाट पाहतोय की त्यांनी मला त्यांच्या मोठ्या खिश्यात टाकावं'

'मला माहिती नव्हते की त्यांचा खिसा एवढा मोठा आहे. मी वाट पाहतोय की त्यांनी मला त्यांच्या मोठ्या खिश्यात टाकावं'

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणावरून राष्ट्रवादी (ncp) आणि भाजपमध्ये  (bjp) कलगीतुरा रंगला आहे. 'त्यांचा खिसा एवढा मोठा आहे का हे मला माहिती नव्हतं. मी वाट पाहतोय की ते मला कधी खिशात टाकताय' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना टोला लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना 'नवाब मलिक सारख्यांना मी खिश्यात ठेवतो' असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सडकून टीका केली होती. त्यानंतर आज मुंबईत नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले. 'मला माहिती नव्हते की त्यांचा खिसा एवढा मोठा आहे. मी वाट पाहतोय की त्यांनी मला त्यांच्या मोठ्या खिश्यात टाकावं.  मी त्यांच्या खिश्यात काय आहे ते पाहिल आणि जनतेला सांगेन, ते मला आता कधी खिशात टाकता याची मी वाट पाहतोय, असं म्हणत मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला लगावला. NCB ला दिलेले वचन Aryan Khan ने पाळले? २४ तासांत उचललं मोठं पाउल दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल नवाब मलिक यांनी आता आणखी एक फोटो ट्वीट केला असून ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल करत समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला. नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याचं कारण असं होतं की, काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. जोरदार पावसाने नोव्हेंबरच होणार स्वागत; उद्यापासून राज्यात मेघगर्जनेसह कोसळधार! तसंच मलिकांनी पुढे आरोप केला आहे की, समीर वानखेडे यांनी बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून यांनी आपली आयडेंटिटी लपवली. म्हणजे दाऊद वानखेडे यांनी डी के वानखेडे नावं लिहिलं. आता ज्ञानदेव वानखेडे लिहायला सुरुवात केली. वानखेडे यांनी त्यांची सून आणि जावई जर आपल्या सोबत राहिले तर आपली आयडेंटिटी ओपन होईल यासाठी दोघांना घटस्फोट दिला.
  Published by:sachin Salve
  First published: