Home /News /mumbai /

बापरे! मुंबईतल्या KEMमधल्या शवगृहात मृतदेहांसाठीही वेटिंग लिस्ट

बापरे! मुंबईतल्या KEMमधल्या शवगृहात मृतदेहांसाठीही वेटिंग लिस्ट

कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडत असेलेल्या प्रचंड ताणामुळे या गोष्टींना विलंब लागत असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई 20 मे: मुंबईतल्या केईएम रुग्णालयातलं शवगृह मृतदेहांनी भरून गेलं आहे. या शवगृहात भरले असून त्या बाहेर 25 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे या मृतदेहांची अजून विल्हेवाट लावता आलेले नाही आणि रुग्णालयातील जागाही भरली आहे. मुख्य म्हणजे हे मृतदेह हाताळणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना पीपीइ किट मिळत नसल्यामुळे अनेक कर्मचारी अशा मृतदेहांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुंबई महापालिकेने केईएम रुग्णालयातील या शवांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. गेले काही दिवस मुंबईत कोरोना बाधित लोकांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाही अशी ओरड  होत होती. पण आता मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृतदेहांनाही वेटिंगवर ठेवावं लागत आहे. कारण रुग्णालयातील शवगृहात मृतदेह ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. के ई एम रुग्णालयातील शावगृहात 26 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. ते पूर्णपणे भरला असून त्याच्या बाहेर सुद्धा 25 शव ठेवण्यात आले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तिंचे नातेवाईक, त्त्या भागतील पोलीस आणि रुग्णवाहिका अश्या सर्व गोष्टींची उपलब्धता आवश्‍यक असते त्याशिवाय तो मृतदेह बाहेर काढता येत नाहीत. परंतु सध्याच्या परिस्थितीत या सर्व गोष्टींची उपलब्धता होत नसल्यामुळे हे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहेत. भयंकर! ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारा अभावी घरातच मृत्यू या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची मागणी आता हॉस्पिटलच्या युनियनेनच केली आहे. मात्र यावर हॉस्पिटल प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकली नाही. पण कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडत असेलेल्या प्रचंड ताणामुळे या गोष्टींना विलंब लागत असल्याचं बोललं जात आहे. हे वाचा - राज्यासाठी महत्त्वाची बातमी, राज्यपालांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक टीका करण्यापेक्षा मोदींकडे मदतीसाठी बोला,राष्ट्रवादी नेत्याचा फडणवीसांना टोला
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या